Page 28
ਇਹੁ ਜਨਮੁ ਪਦਾਰਥੁ ਪਾਇ ਕੈ ਹਰਿ ਨਾਮੁ ਨ ਚੇਤੈ ਲਿਵ ਲਾਇ ॥
या मानवी जीवनाला आशीर्वाद मिळाल्यानंतरही बरेच लोक नामचे भक्ती करीत नाहीत.
ਪਗਿ ਖਿਸਿਐ ਰਹਣਾ ਨਹੀ ਆਗੈ ਠਉਰੁ ਨ ਪਾਇ ॥
(त्यांना हे समजत नाही की) जेव्हा मृत्यू येतो तेव्हा ते येथे राहू शकणार नाहीत आणि परलोकात विश्रांतीची जागा मिळणार नाही.
ਓਹ ਵੇਲਾ ਹਥਿ ਨ ਆਵਈ ਅੰਤਿ ਗਇਆ ਪਛੁਤਾਇ ॥
ही संधी पुन्हा येणार नाही. सरतेशेवटी, ते पश्चाताप करून तो या जगाचा निरोप घेतात.
ਜਿਸੁ ਨਦਰਿ ਕਰੇ ਸੋ ਉਬਰੈ ਹਰਿ ਸੇਤੀ ਲਿਵ ਲਾਇ ॥੪॥
ज्यांच्यावर परमेश्वराची कृपा असते, ते परमेश्वरात लीन होऊन जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात. ॥४॥
ਦੇਖਾ ਦੇਖੀ ਸਭ ਕਰੇ ਮਨਮੁਖਿ ਬੂਝ ਨ ਪਾਇ ||
एकमेकांना पाहून सर्वजण नामस्मरण करू लागतात, पण स्वार्थी व्यक्ती हे समजू शकत नाही.
ਜਿਨ ਗੁਰਮੁਖਿ ਹਿਰਦਾ ਸੁਧੁ ਹੈ ਸੇਵ ਪਈ ਤਿਨ ਥਾਇ ॥
ज्यांचे अंतःकरण शुद्ध असते अशा गुरुमुख जीवांची उपासना सफल होते.
ਹਰਿ ਗੁਣ ਗਾਵਹਿ ਹਰਿ ਨਿਤ ਪੜਹਿ ਹਰਿ ਗੁਣ ਗਾਇ ਸਮਾਇ ॥
ते परमेश्वराची वैभवशाली स्तुती गातात; ते दररोज परमेश्वराबद्दल वाचतात. परमेश्वराची स्तुती गातांना परमेश्वरात पूर्णपणे लीन होतात.
ਨਾਨਕ ਤਿਨ ਕੀ ਬਾਣੀ ਸਦਾ ਸਚੁ ਹੈ ਜਿ ਨਾਮਿ ਰਹੇ ਲਿਵ ਲਾਇ ॥੫॥੪॥੩੭॥
नानकजी म्हणतात की जे जीव परमेश्वराच्या नामात लीन राहतात त्यांचे शब्द नेहमीच सत्य असतात. ॥५॥ ४॥ ३७ ॥
ਸਿਰੀਰਾਗੁ ਮਹਲਾ ੩ ॥
सिरीरागु महला ३ ॥
ਜਿਨੀ ਇਕ ਮਨਿ ਨਾਮੁ ਧਿਆਇਆ ਗੁਰਮਤੀ ਵੀਚਾਰਿ ॥
ज्याने गुरूंच्या उपदेशानुसार एकाग्र चित्ताने परमेश्वराचे नामस्मरण केले आहे,
ਤਿਨ ਕੇ ਮੁਖ ਸਦ ਉਜਲੇ ਤਿਤੁ ਸਚੈ ਦਰਬਾਰਿ ॥
परमेश्वराच्या या सत्यस्वरूपाच्या दरबारात त्यांचे चेहरे सदैव तेजस्वी असतात, म्हणजेच परमेश्वराच्या दरबारात त्यांचा आदर होतो.
ਓਇ ਅੰਮ੍ਰਿਤੁ ਪੀਵਹਿ ਸਦਾ ਸਦਾ ਸਚੈ ਨਾਮਿ ਪਿਆਰਿ ॥੧॥
तेच गुरुमुख जीव परमेश्वराचे नामस्मरण करतात आणि सदैव ब्रह्मानंदाचे अमृत पान करतात. ॥१॥
ਭਾਈ ਰੇ ਗੁਰਮੁਖਿ ਸਦਾ ਪਤਿ ਹੋਇ ॥
हे भावा! गुरूच्या उपदेशाचे पालन करून एखाद्याचा सदैव सन्मान केला जातो.
ਹਰਿ ਹਰਿ ਸਦਾ ਧਿਆਈਐ ਮਲੁ ਹਉਮੈ ਕਢੈ ਧੋਇ ॥੧॥ ਰਹਾਉ ॥
जर आपण नेहमी परमेश्वराचे नामस्मरण केले तर ते हृदयातील अहंकाराची घाण धुवून टाकते. ॥ १॥ रहाउ॥
ਮਨਮੁਖ ਨਾਮੁ ਨ ਜਾਣਨੀ ਵਿਣੁ ਨਾਵੈ ਪਤਿ ਜਾਇ ॥
स्वतःच्या अहंकारात जीवन जगणारे लोक परमेश्वराचे नामस्मरण करत नाही आणि परमेश्वराचे नामस्मरण न केल्याने ते आपला सन्मान गमावतात.
ਸਬਦੈ ਸਾਦੁ ਨ ਆਇਓ ਲਾਗੇ ਦੂਜੈ ਭਾਇ ॥
अशा जीवांना द्वैत-भावामध्ये रमल्यामुळे गुरूंच्या उपदेशाचा आनंद अनुभवता येत नाही.
ਵਿਸਟਾ ਕੇ ਕੀੜੇ ਪਵਹਿ ਵਿਚਿ ਵਿਸਟਾ ਸੇ ਵਿਸਟਾ ਮਾਹਿ ਸਮਾਇ ॥੨॥
ज्याप्रमाणे विष्ठेतील कृमी विष्ठेत राहतात आणि तेथेच मरतात (त्याचप्रमाणे स्वेच्छेचा आत्मा देखील इंद्रिय वासनांच्या मलिनतेत मग्न होऊन शेवटी नरकाच्या मलिनतेत लीन होतो.) ॥ २॥
ਤਿਨ ਕਾ ਜਨਮੁ ਸਫਲੁ ਹੈ ਜੋ ਚਲਹਿ ਸਤਗੁਰ ਭਾਇ ॥
जे गुरूच्या इच्छेनुसार चालतात त्यांचे जीवन फलदायी आहे.
ਕੁਲੁ ਉਧਾਰਹਿ ਆਪਣਾ ਧੰਨੁ ਜਣੇਦੀ ਮਾਇ ॥
त्यांच्या कुटुंबियांना जतन केले जातात; धन्य त्यांना जन्म दिला ती माता आहेत.
ਹਰਿ ਹਰਿ ਨਾਮੁ ਧਿਆਈਐ ਜਿਸ ਨਉ ਕਿਰਪਾ ਕਰੇ ਰਜਾਇ ॥੩॥
तर हे भावा! परमेश्वराचे, परमपिता यांचे नामस्मरण करा, परंतु ज्याच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे तोच आत्मा नामस्मरण करू शकतो. ॥३॥
ਜਿਨੀ ਗੁਰਮੁਖਿ ਨਾਮੁ ਧਿਆਇਆ ਵਿਚਹੁ ਆਪੁ ਗਵਾਇ ॥
ज्यांनी गुरूच्या माध्यमातून परमेश्वराचे नामस्मरण केले आहे, ते अहंकाराचा त्याग करतात.
ਓਇ ਅੰਦਰਹੁ ਬਾਹਰਹੁ ਨਿਰਮਲੇ ਸਚੇ ਸਚਿ ਸਮਾਇ ॥
ते आतून आणि बाहेरून (अंत:करणाने आणि शारीरिकदृष्ट्या) शुद्ध आहेत आणि ते परमेश्वराच्या त्या सत्य स्वरूपात निश्चितपणे ते खऱ्या अर्थाने विलीन होतात.
ਨਾਨਕ ਆਏ ਸੇ ਪਰਵਾਣੁ ਹਹਿ ਜਿਨ ਗੁਰਮਤੀ ਹਰਿ ਧਿਆਇ ॥੪॥੫॥੩੮॥
हे नानक! जे गुरूंच्या उपदेशाचे पालन करतात आणि प्रेम आणि भक्तीने परमेश्वराचे नामस्मरण करतात त्यांचे आचरण धन्य आहे.॥४॥५॥३८॥
ਸਿਰੀਰਾਗੁ ਮਹਲਾ ੩ ॥
सिरीरागु महला ३ ॥
ਹਰਿ ਭਗਤਾ ਹਰਿ ਧਨੁ ਰਾਸਿ ਹੈ ਗੁਰ ਪੂਛਿ ਕਰਹਿ ਵਾਪਾਰੁ ॥
परमेश्वराच्या भक्तांकडे परमेश्वराच्या नामाचे भांडवल असते आणि ते गुरूंना विचारून नामाचा व्यापार करतात.
ਹਰਿ ਨਾਮੁ ਸਲਾਹਨਿ ਸਦਾ ਸਦਾ ਵਖਰੁ ਹਰਿ ਨਾਮੁ ਅਧਾਰੁ ॥
ते सदासर्वकाळ परमेश्वराच्या नामाची स्तुती करतात. परमेश्वराचे नाम त्यांचे भांडवल आणि समर्थन आहे.
ਗੁਰਿ ਪੂਰੈ ਹਰਿ ਨਾਮੁ ਦ੍ਰਿੜਾਇਆ ਹਰਿ ਭਗਤਾ ਅਤੁਟੁ ਭੰਡਾਰੁ ॥੧॥
पूर्ण गुरूने त्यांना परमेश्वराच्या नामाने दृढ केले आहे, म्हणून त्यांचे नाव अक्षय भंडार आहे. ॥१॥
ਭਾਈ ਰੇ ਇਸੁ ਮਨ ਕਉ ਸਮਝਾਇ ॥
हे भावा! या चंचल मनाला समजावून सांग.
ਏ ਮਨ ਆਲਸੁ ਕਿਆ ਕਰਹਿ ਗੁਰਮੁਖਿ ਨਾਮੁ ਧਿਆਇ ॥੧॥ ਰਹਾਉ ॥
हे माझ्या मना! तू आळशी का आहेस? गुरुचे मार्गदर्शन घे आणि परमेश्वराचे नामस्मरण कर. ॥ १॥ रहाउ॥
ਹਰਿ ਭਗਤਿ ਹਰਿ ਕਾ ਪਿਆਰੁ ਹੈ ਜੇ ਗੁਰਮੁਖਿ ਕਰੇ ਬੀਚਾਰੁ ॥
गुरूंच्या उपदेशाकडे पूर्ण लक्ष देताना भगवंताची सखोल चिंतन करणे ही खरी भक्ती आहे.
ਪਾਖੰਡਿ ਭਗਤਿ ਨ ਹੋਵਈ ਦੁਬਿਧਾ ਬੋਲੁ ਖੁਆਰੁ ॥
ढोंगीपणाद्वारे परमेश्वराची उपासना केली जाऊ शकत नाही. द्वैत (परमेश्वराशिवाय इतर गोष्टींवर प्रेम) बोललेले कोणतेही शब्द हानी पोहोचवतात.
ਸੋ ਜਨੁ ਰਲਾਇਆ ਨਾ ਰਲੈ ਜਿਸੁ ਅੰਤਰਿ ਬਿਬੇਕ ਬੀਚਾਰੁ ॥੨॥
परंतु, ज्या व्यक्तीला खरे ज्ञान आणि दैवी ज्ञान आहे, तो ढोंगींच्या गर्दीतही उभा आहे.
ਸੋ ਸੇਵਕੁ ਹਰਿ ਆਖੀਐ ਜੋ ਹਰਿ ਰਾਖੈ ਉਰਿ ਧਾਰਿ ॥
त्यांच्या अंत:करणात परमेश्वर असत, त्यांना पेमेश्वराचा करा सेवक मानले जाते.
ਮਨੁ ਤਨੁ ਸਉਪੇ ਆਗੈ ਧਰੇ ਹਉਮੈ ਵਿਚਹੁ ਮਾਰਿ ॥
परमेश्वरासमोर मन आणि शरीर अर्पण करून ते आतून अहंकाराचा त्याग करतात.
ਧਨੁ ਗੁਰਮੁਖਿ ਸੋ ਪਰਵਾਣੁ ਹੈ ਜਿ ਕਦੇ ਨ ਆਵੈ ਹਾਰਿ ॥੩॥
परमेश्वराच्या आशीर्वादाने धन्य असलेले आणि त्यांनी स्वीकारलेले गुरूचे अनुयायी आहेत, ज्यांना जीवनाच्या युद्धात दुर्गुणांनी कधीही पराभूत केले नाही.॥३॥
ਕਰਮਿ ਮਿਲੈ ਤਾ ਪਾਈਐ ਵਿਣੁ ਕਰਮੈ ਪਾਇਆ ਨ ਜਾਇ ॥
जे त्याची कृपा प्राप्त करतात ते त्यांना तो भेटतो. अन्यथा त्याच्या कृपेशिवाय तो प्राप्त होऊ शकत नाही.