Guru Granth Sahib Translation Project

guru-granth-sahib-marathi-page-1

Page 1

ੴ ਸਤਿ ਨਾਮੁ ਕਰਤਾ ਪੁਰਖੁ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰੁ ਅਕਾਲ ਮੂਰਤਿ ਅਜੂਨੀ ਸੈਭੰ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦਿ ॥ ईश्वर हा एकच आहे आणि चराचरात त्याचे अस्तित्त्व शाश्वत आहे. जो सृष्टीचा निर्माता आहे, सर्वव्यापक आहे, भयरहित आहे (निर्भय), ज्याच्यात वैर नाही (निर्वैर), ज्याचे स्वरूप काळाच्या पलीकडचे आहे, (अर्थ- ज्याचे शरीर विनाशापासून मुक्त आहे), जो अयोनी आहे, जो स्वयंभू आहे आणि जो गुरूकृपेमुळे प्राप्त होतो.
॥ ਜਪੁ ॥ जप करा. (याला गुरूच्या वाणीत महत्त्वाचे देखील मानली जाते.)
ਆਦਿ ਸਚੁ ਜੁਗਾਦਿ ਸਚੁ ॥ निरंकार (ईश्वर) तोच सत्य आहे, एकमेव आहे. जो सृष्टीच्या प्रारंभाच्या आधीपासून सत्य आहे आणि युगाच्या प्रारंभापासून सत्य आहे.
ਹੈ ਭੀ ਸਚੁ ਨਾਨਕ ਹੋਸੀ ਭੀ ਸਚੁ ॥੧॥ वर्तमानकाळात आणि येणाऱ्या अनेक युग येऊन निघून गेल्यानंतर सुद्धा ईश्वराचे अस्तित्व राहील. श्री गुरु नानक देव जी यांचे कथन आहे की भविष्यकाळात देखील परमेश्वराचे अस्तित्त्व राहणार आहे. ||१||
ਸੋਚੈ ਸੋਚਿ ਨ ਹੋਵਈ ਜੇ ਸੋਚੀ ਲਖ ਵਾਰ ॥ कोणी लाखो वेळा आंघोळ करून शरीर शुद्ध केले तरी त्यामुळे त्याचे मन शुद्ध होत नाही. मनाच्या शुद्धीविना परमेश्वराचा (वाहिगुरु) विचारही करता येत नाही.
ਚੁਪੈ ਚੁਪ ਨ ਹੋਵਈ ਜੇ ਲਾਇ ਰਹਾ ਲਿਵ ਤਾਰ ॥ फक्त एकाग्र होऊन शांत समाधी अवस्थेत बसल्याने मन शांत होत नाही, जोपर्यंत तुमच्या मनातून वाईट विचार निघून जात नाही.
ਭੁਖਿਆ ਭੁਖ ਨ ਉਤਰੀ ਜੇ ਬੰਨਾ ਪੁਰੀਆ ਭਾਰ ॥ शरीराने उपाशी राहून मनाची भूक कधीच शांत होत नाही. मनाची शांती प्राप्त करण्यासाठी वैकुंठ आणि इंद्रपुरी यातील वैभव सुद्धा कमी आहे.
ਸਹਸ ਸਿਆਣਪਾ ਲਖ ਹੋਹਿ ਤ ਇਕ ਨ ਚਲੈ ਨਾਲਿ ॥ एखाद्याच्या मनात लाखो-हजारो चतुर विचार असले तरी ते अहंकाराने युक्त असल्याने ते त्याला परमेश्वराशी एकरूप होण्यास त्याला मदत करत नाही.
ਕਿਵ ਸਚਿਆਰਾ ਹੋਈਐ ਕਿਵ ਕੂੜੈ ਤੁਟੈ ਪਾਲਿ ॥ मग प्रश्न हा निर्माण होतो की परमेश्वरासमोर सत्याचा प्रकाश कसा निर्माण होणार? त्याच्या आणि परमेश्वराच्या मध्ये जी असत्याची भिंत आहे ती कशी नष्ट होणार?
ਹੁਕਮਿ ਰਜਾਈ ਚਲਣਾ ਨਾਨਕ ਲਿਖਿਆ ਨਾਲਿ ॥੧॥ सत्याचे स्वरूप स्पष्ट करतांना गुरू नानक सांगतात की हे सृष्टीची रचना होण्याआधीपासूनच लिहिले आहे की प्रापंचिक व्यक्ती परमेश्वराच्या आदेशानुसार वागला तर हे सर्व सहजतेने प्राप्त करू शकतो.
ਹੁਕਮੀ ਹੋਵਨਿ ਆਕਾਰ ਹੁਕਮੁ ਨ ਕਹਿਆ ਜਾਈ ॥ (सृष्टीतील) प्रत्येक वस्तू परमेश्वराच्या आज्ञेनेच निर्माण झाली आहे, परंतु त्यांच्या वचनांना आपण शब्दाद्वारे व्यक्त करू शकत नाही.
ਹੁਕਮੀ ਹੋਵਨਿ ਜੀਅ ਹੁਕਮਿ ਮਿਲੈ ਵਡਿਆਈ ॥ परमेश्वराच्या आज्ञेनेच (या पृथ्वीवर) वेगवेगळ्या योनीमध्ये जीव जन्म घेतात, त्याच्या आज्ञेनेच त्यांना मान-सम्मान ( उच्च किंवा निच स्थान) प्राप्त होतो.
ਹੁਕਮੀ ਉਤਮੁ ਨੀਚੁ ਹੁਕਮਿ ਲਿਖਿ ਦੁਖ ਸੁਖ ਪਾਈਅਹਿ ॥ परमेश्वराच्या आज्ञेनेच जीव श्रेष्ठ किंवा निम्न जीवन प्राप्त करतो. त्याच्या लिखित आदेशानेच जीव सुख-दुःखाचा अनुभव घेतो.
ਇਕਨਾ ਹੁਕਮੀ ਬਖਸੀਸ ਇਕਿ ਹੁਕਮੀ ਸਦਾ ਭਵਾਈਅਹਿ ॥ परमेश्वराच्या आदेशानुसारच सृष्टीतील अनेक जीवांना आशीर्वाद मिळतात आणि काही जीव त्याच्या आदेशानेच सृष्टीतील ये-जा च्या चक्रात अडकतात.
ਹੁਕਮੈ ਅੰਦਰਿ ਸਭੁ ਕੋ ਬਾਹਰਿ ਹੁਕਮ ਨ ਕੋਇ ॥ प्रत्येकजण त्याच्या आज्ञेच्या अधीन आहे; कोणीही त्याच्या आज्ञा त्याच्या आज्ञेबाहेर सृष्टीतील कोणतेही कार्य नाही.
ਨਾਨਕ ਹੁਕਮੈ ਜੇ ਬੁਝੈ ਤ ਹਉਮੈ ਕਹੈ ਨ ਕੋਇ ॥੨॥ 'हे नानक, जर लोकांना त्याची आज्ञा समजली तर कोणीही अहंकाराने वागणार नाही. हाच अहंकार ऐहिक वैभवात रमलेल्या जीवाला निरंकाराच्या जवळ येऊ देत नाही.
ਗਾਵੈ ਕੋ ਤਾਣੁ ਹੋਵੈ ਕਿਸੈ ਤਾਣੁ ॥ (परमेश्वराच्या कृपेनेच) ज्याच्याकडे आध्यात्मिक शक्ती आहे तोच त्याच्या (सर्वशक्तिमान) शक्तीचे गुणगान गाऊ शकतो.
ਗਾਵੈ ਕੋ ਦਾਤਿ ਜਾਣੈ ਨੀਸਾਣੁ ॥ काहीजण त्यांनी दिलेल्या भेटवस्तूंना त्यांचा आशीर्वाद मानून त्यांच्या कीर्तीचे गुणगान गातात.
ਗਾਵੈ ਕੋ ਗੁਣ ਵਡਿਆਈਆ ਚਾਰ ॥ काही लोक त्याचे अवर्णनीय गुण आणि महिमेचे गुणगान गातात.
ਗਾਵੈ ਕੋ ਵਿਦਿਆ ਵਿਖਮੁ ਵੀਚਾਰੁ ॥ काहीजण त्याच्या विद्येच्या माध्यमातून विषम विचारांचे (ज्ञानाचे) गुणगान गातो.
ਗਾਵੈ ਕੋ ਸਾਜਿ ਕਰੇ ਤਨੁ ਖੇਹ ॥ काहीजण त्याला परमेश्वराचे रूप, निर्माता आणि संहारक मानून त्याची स्तुती करतात.
ਗਾਵੈ ਕੋ ਜੀਅ ਲੈ ਫਿਰਿ ਦੇਹ ॥ काहीजण परमेश्वराचे वर्णन असे करतात की परम शक्ती जीवन देते आणि नंतर ते परत घेते.
ਗਾਵੈ ਕੋ ਜਾਪੈ ਦਿਸੈ ਦੂਰਿ ॥ काही जीव त्या निरंकाराला, परमेश्वराला स्वतःपासून दूर समजून त्याचे गुणगान गातात.


© 2017 SGGS ONLINE
error: Content is protected !!
Scroll to Top