Guru Granth Sahib Translation Project

Guru Granth Sahib Marathi Page 4

Page 4

ਅਸੰਖ ਭਗਤ ਗੁਣ ਗਿਆਨ ਵੀਚਾਰ ॥ त्या सद्गुरु निरंकाराच्या गुणांचे चिंतन करून ज्ञान प्राप्त करणारे असे असंख्य भक्त आहेत.
ਅਸੰਖ ਸਤੀ ਅਸੰਖ ਦਾਤਾਰ ॥ सत्य जाणणारे किंवा परोपकाराचा मार्ग अवलंबणारे असंख्य सज्जन आहेत.
ਅਸੰਖ ਸੂਰ ਮੁਹ ਭਖ ਸਾਰ ॥ रणांगणात शत्रूला तोंड देताना अगणित योद्धे शस्त्रास्त्रांचा मारा सहन करतात.
ਅਸੰਖ ਮੋਨਿ ਲਿਵ ਲਾਇ ਤਾਰ ॥ असंख्य मानव जीव मौन धारण करून एकाग्र होऊन त्या अकाल-पुरखात तल्लीन राहतात.
ਕੁਦਰਤਿ ਕਵਣ ਕਹਾ ਵੀਚਾਰੁ ॥ त्यामुळे त्या अवर्णनीय परमेश्वराच्या सामर्थ्याचा विचार करण्याइतकी बुद्धी माझ्यात नाही.
ਵਾਰਿਆ ਨ ਜਾਵਾ ਏਕ ਵਾਰ ॥ हे अनंत स्वरूप! मी इतका निर्बळ आहे की, मी तुमच्यासाठी एकदाही स्वत: ला समर्पित करण्यास सक्षम नाही.
ਜੋ ਤੁਧੁ ਭਾਵੈ ਸਾਈ ਭਲੀ ਕਾਰ ॥ तुम्हाला जे कार्य आवडते ते कार्य सर्वोश्रेष्ठ आहे.
ਤੂ ਸਦਾ ਸਲਾਮਤਿ ਨਿਰੰਕਾਰ ॥੧੭॥ हे निरंकार ! हे परब्रह्म! तू सदैव शाश्वत रूप आहेस. ॥१७॥
ਅਸੰਖ ਮੂਰਖ ਅੰਧ ਘੋਰ ॥ या सृष्टीतील असंख्य माणसे मूर्ख आणि अज्ञानी आहेत.
ਅਸੰਖ ਚੋਰ ਹਰਾਮਖੋਰ ॥ चोर आणि अभक्ष्य खाणारे असंख्य आहेत, जे चोरून दुसऱ्यांचा माल खातात.
ਅਸੰਖ ਅਮਰ ਕਰਿ ਜਾਹਿ ਜੋਰ ॥ असे असंख्य लोक आहेत जे कठोर आचरणाने इतरांवर अत्याचारीपणे राज्य करून या संसाराचा त्याग करतात.
ਅਸੰਖ ਗਲਵਢ ਹਤਿਆ ਕਮਾਹਿ ॥ असंख्य अधर्मी लोक आहेत जे इतरांचा गळा कापून हत्येचे पाप कमावत आहेत.
ਅਸੰਖ ਪਾਪੀ ਪਾਪੁ ਕਰਿ ਜਾਹਿ ॥ असंख्य पापी लोक पाप करून या जगातून निघून जातात.
ਅਸੰਖ ਕੂੜਿਆਰ ਕੂੜੇ ਫਿਰਾਹਿ ॥ खोट्या स्वभाव असणारे असंख्य लोक खोटे बोलत फिरतात.
ਅਸੰਖ ਮਲੇਛ ਮਲੁ ਭਖਿ ਖਾਹਿ ॥ आपल्या घाणेरड्या मनामुळे अनैतिक वर्तन करणारे असंख्य लोक आहेत.
ਅਸੰਖ ਨਿੰਦਕ ਸਿਰਿ ਕਰਹਿ ਭਾਰੁ ॥ इतरांवर टीका करून असंख्य लोक पापाचे ओझे डोक्यावर घेतात.
ਨਾਨਕੁ ਨੀਚੁ ਕਹੈ ਵੀਚਾਰੁ ॥ श्री गुरु नानक देवांनी पापी आणि दुष्ट, अज्ञानी लोक, अभक्ष्य पदार्थांचे सेवन करणारे, दुष्ट आणि अधर्मी लोकांच्या चारित्र्याचे वर्णन करताना त्यांनी स्वतःला त्यांच्यासमोर अत्यंत तुच्छ दाखवले आहे.
ਵਾਰਿਆ ਨ ਜਾਵਾ ਏਕ ਵਾਰ ॥ हे अनंत स्वरूप! मी इतका निर्बळ आहे की, मी तुमच्यासाठी एकदाही स्वत: ला समर्पित करण्यास सक्षम नाही.
ਜੋ ਤੁਧੁ ਭਾਵੈ ਸਾਈ ਭਲੀ ਕਾਰ ॥ तुम्हाला जे कार्य आवडते ते कार्य सर्वोश्रेष्ठ आहे.
ਤੂ ਸਦਾ ਸਲਾਮਤਿ ਨਿਰੰਕਾਰ ॥੧੮॥ हे निरंकार ! हे परब्रह्म! तू सदैव शाश्वत रूप आहेस. ॥१८॥
ਅਸੰਖ ਨਾਵ ਅਸੰਖ ਥਾਵ ॥ त्या निर्मात्याच्या सृष्टीमध्ये असंख्य नावांनी आणि असंख्य ठिकाणी असलेले जीव फिरत असतात; किंवा या सृष्टीमध्ये अकाल-पुरुखाची अनेक नावे आहेत आणि अनेक ठिकाणी आहेत, जिथे परमेश्वराचा वास आहे.
ਅਗੰਮ ਅਗੰਮ ਅਸੰਖ ਲੋਅ ॥ असंख्य हेच अकाल्पानिक लोक आहेत.
ਅਸੰਖ ਕਹਹਿ ਸਿਰਿ ਭਾਰੁ ਹੋਇ ॥ पण जे लोक त्याच्या निर्मितीचे गणित मांडताना 'असंख्य' हा शब्द वापरतात त्यांच्याही डोक्यावर ओझे असते.
ਅਖਰੀ ਨਾਮੁ ਅਖਰੀ ਸਾਲਾਹ ॥ शब्दांद्वारेच त्या निरंकाराचे नाम जपता येते, शब्दांद्वारेच त्याची स्तुती करता येते.
ਅਖਰੀ ਗਿਆਨੁ ਗੀਤ ਗੁਣ ਗਾਹ ॥ परमेश्वराच्या गुणांचे ज्ञानही शब्दांतून मिळू शकते आणि आणि त्याची स्तुतीसुध्दा केवळ शब्दांतून व्यक्त करता येते.
ਅਖਰੀ ਲਿਖਣੁ ਬੋਲਣੁ ਬਾਣਿ ॥ त्याची वाणी शब्दांतूनच लिहिता व बोलता येते.
ਅਖਰਾ ਸਿਰਿ ਸੰਜੋਗੁ ਵਖਾਣਿ ॥ केवळ शब्दांद्वारे एखाद्याचे नशीब स्पष्ट केले जाऊ शकते.
ਜਿਨਿ ਏਹਿ ਲਿਖੇ ਤਿਸੁ ਸਿਰਿ ਨਾਹਿ ॥ पण ज्या परमेश्वराने सर्वांचे नशीब लिहिले आहे, तो स्वतः नशिबाच्या पलीकडे आहे.
ਜਿਵ ਫੁਰਮਾਏ ਤਿਵ ਤਿਵ ਪਾਹਿ ॥ ज्याप्रमाणे अकालपुरुख मनुष्याच्या कर्मानुसार आदेश देतात, त्याचप्रमाणे तो त्याच्या कर्मांचे भोग भोगतो.
ਜੇਤਾ ਕੀਤਾ ਤੇਤਾ ਨਾਉ ॥ निर्मात्याने ही सृष्टीचा प्रसार जितका केला आहे, ती सर्व त्याची नावे आणि रूपे आहेत.
ਵਿਣੁ ਨਾਵੈ ਨਾਹੀ ਕੋ ਥਾਉ ॥ कोणालाही त्याच्या नावाशिवाय, मुळीच स्थान नाही.
ਕੁਦਰਤਿ ਕਵਣ ਕਹਾ ਵੀਚਾਰੁ ॥ त्यामुळे त्या अवर्णनीय परमेश्वराच्या सामर्थ्याचा विचार करण्याइतकी बुद्धी माझ्यात नाही.
ਵਾਰਿਆ ਨ ਜਾਵਾ ਏਕ ਵਾਰ ॥ हे अनंत स्वरूप! मी इतका निर्बळ आहे की, मी तुमच्यासाठी एकदाही स्वत: ला समर्पित करण्यास सक्षम नाही.
ਜੋ ਤੁਧੁ ਭਾਵੈ ਸਾਈ ਭਲੀ ਕਾਰ ॥ तुम्हाला जे कार्य आवडते ते कार्य सर्वोश्रेष्ठ आहे.
ਤੂ ਸਦਾ ਸਲਾਮਤਿ ਨਿਰੰਕਾਰ ॥੧੯॥ हे निरंकार ! हे परब्रह्म! तू सदैव शाश्वत रूप आहेस. ॥१९॥
ਭਰੀਐ ਹਥੁ ਪੈਰੁ ਤਨੁ ਦੇਹ ॥ हे शरीर! हात, पाय किंवा इतर कोणताही अवयव घाण झाल्यास.
ਪਾਣੀ ਧੋਤੈ ਉਤਰਸੁ ਖੇਹ ॥ ती घाण पाण्याने धुतल्यास निघून जाते.
ਮੂਤ ਪਲੀਤੀ ਕਪੜੁ ਹੋਇ ॥ जर मलमूत्र इत्यादीने कोणतेही कपडे अशुद्ध झाल्यास.
ਦੇ ਸਾਬੂਣੁ ਲਈਐ ਓਹੁ ਧੋਇ ॥ तर ते साबणाने धुतले जाते.
ਭਰੀਐ ਮਤਿ ਪਾਪਾ ਕੈ ਸੰਗਿ ॥ जर माणसाची बुद्धी वाईट कर्मामुळे अपवित्र झाली,
ਓਹੁ ਧੋਪੈ ਨਾਵੈ ਕੈ ਰੰਗਿ ॥ तर ती केवळ वाहेगुरुच्या नामस्मरणानेच पवित्र होऊ शकते.
ਪੁੰਨੀ ਪਾਪੀ ਆਖਣੁ ਨਾਹਿ ॥ पुण्य आणि पाप फक्त बोलण्यासाठी नाही.
ਕਰਿ ਕਰਿ ਕਰਣਾ ਲਿਖਿ ਲੈ ਜਾਹੁ ॥ तर, या जगात राहून मनुष्याने केलेल्या प्रत्येक चांगल्या-वाईट कर्मांचा तपशील धर्मराजाने पाठवलेल्या चित्र-गुप्ताद्वारे लिहिला जाईल, ज्याचा परिणाम म्हणून त्याला स्वर्ग किंवा नरक प्राप्त होईल.
ਆਪੇ ਬੀਜਿ ਆਪੇ ਹੀ ਖਾਹੁ ॥ शेवटी मनुष्य स्वतः कर्माचे बीज पेरतो आणि त्याचे फळ प्राप्त करतो.
ਨਾਨਕ ਹੁਕਮੀ ਆਵਹੁ ਜਾਹੁ ॥੨੦॥ गुरु नानक म्हणतात की, या जगात, जीवाची कर्मे त्याला जन्म-मृत्यूच्या चक्रात ठेवतील, निरंकार जीवाला त्याच्या कर्मानुसार फळ देईल. ॥२०॥
ਤੀਰਥੁ ਤਪੁ ਦਇਆ ਦਤੁ ਦਾਨੁ ॥ तीर्थयात्रा, तपश्चर्या, प्राणिमात्रांबद्दल करुणा आणि निःस्वार्थ दान केल्याने
ਜੇ ਕੋ ਪਾਵੈ ਤਿਲ ਕਾ ਮਾਨੁ ॥ जर एखादा मनुष्य सम्मान मिळवतो तर तो फारच लहान असतो.
ਸੁਣਿਆ ਮੰਨਿਆ ਮਨਿ ਕੀਤਾ ਭਾਉ ॥ परंतु ज्यांनी परमेश्वराचे नाम अंतःकरणात प्रेमाने ऐकले आणि सतत त्याचा विचार केला.
ਅੰਤਰਗਤਿ ਤੀਰਥਿ ਮਲਿ ਨਾਉ ॥ जणू त्याने आपल्या आतल्या तीर्थात स्नान करून आपली घाण दूर केली आहे.(म्हणजेच त्या जीवाने आपल्या अंतःकरणात वसलेल्या निरंकारात लीन होऊन आपल्या अंतरात्म्याची मलिनता शुद्ध केली आहे.)
ਸਭਿ ਗੁਣ ਤੇਰੇ ਮੈ ਨਾਹੀ ਕੋਇ ॥ हे सर्गुण स्वरूप ! सर्व गुण तुझ्यात आहेत, माझ्यात चांगले गुण नाहीत.
ਵਿਣੁ ਗੁਣ ਕੀਤੇ ਭਗਤਿ ਨ ਹੋਇ ॥ नैतिकतेचे गुण अंगीकारल्याशिवाय परमेश्वराची भक्ती होऊ शकत नाही.
ਸੁਅਸਤਿ ਆਥਿ ਬਾਣੀ ਬਰਮਾਉ ॥ हे निरंकार ! तू सदैव विजयी होवो, तूच कल्याणकारी, ब्रह्मदेवाचे रूप आहेस.
ਸਤਿ ਸੁਹਾਣੁ ਸਦਾ ਮਨਿ ਚਾਉ ॥ तुम्ही सत्य, चेतना आणि नेहमी आनंदाचे मूर्त स्वरूप आहात.
ਕਵਣੁ ਸੁ ਵੇਲਾ ਵਖਤੁ ਕਵਣੁ ਕਵਣ ਥਿਤਿ ਕਵਣੁ ਵਾਰੁ ॥ जेव्हा परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती केली तेव्हा तो कोणती वेळ, कोणता क्षण, कोणती तारीख आणि कोणता दिवस होता?
ਕਵਣਿ ਸਿ ਰੁਤੀ ਮਾਹੁ ਕਵਣੁ ਜਿਤੁ ਹੋਆ ਆਕਾਰੁ ॥ तेव्हा कोणता ऋतू , कोणता महिना होता ज्यावेळी या सृष्टीची निर्मिती झाली? हे सर्व कोणाला माहिती आहे?
ਵੇਲ ਨ ਪਾਈਆ ਪੰਡਤੀ ਜਿ ਹੋਵੈ ਲੇਖੁ ਪੁਰਾਣੁ ॥ मोठमोठे विद्वान, ऋषी-मुनी इत्यादींनाही सृष्टीची निर्मितीचा नेमका काळ कळू शकला नाही, जर त्यांना माहीत असते तर त्यांनी वेदांमध्ये किंवा धर्मग्रंथांमध्ये नक्कीच त्याचा उल्लेख केला असता.
ਵਖਤੁ ਨ ਪਾਇਓ ਕਾਦੀਆ ਜਿ ਲਿਖਨਿ ਲੇਖੁ ਕੁਰਾਣੁ ॥ काझींनाही या वेळेची कल्पना नव्हती, जर त्यांना माहिती असते तर त्यांनी कुराण वगैरेमध्ये नक्कीच नमूद केले असते.
ਥਿਤਿ ਵਾਰੁ ਨਾ ਜੋਗੀ ਜਾਣੈ ਰੁਤਿ ਮਾਹੁ ਨਾ ਕੋਈ ॥ या सृष्टीच्या निर्मितीचा दिवस, वेळ, ऋतू, महिना इत्यादी एका योगीलाही कळू शकलेले नाही.
ਜਾ ਕਰਤਾ ਸਿਰਠੀ ਕਉ ਸਾਜੇ ਆਪੇ ਜਾਣੈ ਸੋਈ ॥ याबद्दल, या जगाचा निर्माता स्वतः जाणून घेऊ शकतो की या सृष्टीचा प्रसार कधी झाला.
ਕਿਵ ਕਰਿ ਆਖਾ ਕਿਵ ਸਾਲਾਹੀ ਕਿਉ ਵਰਨੀ ਕਿਵ ਜਾਣਾ ॥ त्या अकालपुरुषाचा चमत्कार मी कसा सांगू, त्याची स्तुती कशी करू, त्याचे वर्णन कसे करू आणि त्याचे रहस्य कसे जाणू?


© 2025 SGGS ONLINE
error: Content is protected !!
Scroll to Top