Page 917
ਰਾਮਕਲੀ ਮਹਲਾ ੩ ਅਨੰਦੁ
रामकली महला ३ अनंदु
ੴ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦਿ ॥
ੴ सतिगुर प्रसादि ॥
ਅਨੰਦੁ ਭਇਆ ਮੇਰੀ ਮਾਏ ਸਤਿਗੁਰੂ ਮੈ ਪਾਇਆ ॥
हे माझी आई! माझ्या मनात फक्त आनंद आहे कारण मला सद्गुरू मिळाले आहेत.
ਸਤਿਗੁਰੁ ਤ ਪਾਇਆ ਸਹਜ ਸੇਤੀ ਮਨਿ ਵਜੀਆ ਵਾਧਾਈਆ ॥
सद्गुरूना भेटल्यावर, मी सहज शांत आणि समतोल अशा अवस्थेत असतो, जणू माझ्या मनात आनंदी नाद वाजत असतो.
ਰਾਗ ਰਤਨ ਪਰਵਾਰ ਪਰੀਆ ਸਬਦ ਗਾਵਣ ਆਈਆ ॥
सद्गुरूना भेटल्यानंतर मला असे वाटते की जणू रत्नांसारखी मौल्यवान वाद्ये आपल्या परीसारख्या कुटुंबासह परमेश्वराचे गुणगान गाण्यासाठी आली आहेत.
ਸਬਦੋ ਤ ਗਾਵਹੁ ਹਰੀ ਕੇਰਾ ਮਨਿ ਜਿਨੀ ਵਸਾਇਆ ॥
ज्यांनी परमेश्वराला आपल्या मनात स्थान दिले आहे, त्या सर्वांनी त्या परमेश्वराची स्तुती करावी.
ਕਹੈ ਨਾਨਕੁ ਅਨੰਦੁ ਹੋਆ ਸਤਿਗੁਰੂ ਮੈ ਪਾਇਆ ॥੧॥
नानक म्हणतात की सद्गुरू मिळाल्यावर माझ्या मनात आनंद निर्माण झाला आहे. ॥१॥
ਏ ਮਨ ਮੇਰਿਆ ਤੂ ਸਦਾ ਰਹੁ ਹਰਿ ਨਾਲੇ ॥
हे माझ्या मना ! तू सदैव परमेश्वराच्या भक्तीत लीन राहा.
ਹਰਿ ਨਾਲਿ ਰਹੁ ਤੂ ਮੰਨ ਮੇਰੇ ਦੂਖ ਸਭਿ ਵਿਸਾਰਣਾ ॥
हे माझ्या मना ! परमेश्वराच्या भक्तीत लीन राहिल्यास तो तुझे सर्व दुःख दूर करेल.
ਅੰਗੀਕਾਰੁ ਓਹੁ ਕਰੇ ਤੇਰਾ ਕਾਰਜ ਸਭਿ ਸਵਾਰਣਾ ॥
परमेश्वर सदैव तुझी साथ देईल आणि तुझी सर्व कामे सहजतेने पूर्ण करेल.
ਸਭਨਾ ਗਲਾ ਸਮਰਥੁ ਸੁਆਮੀ ਸੋ ਕਿਉ ਮਨਹੁ ਵਿਸਾਰੇ ॥
जो परमेश्वर सर्व गोष्टी पूर्ण करण्यास समर्थ आहे, त्या परमेश्वराला तू का विसरत आहे?
ਕਹੈ ਨਾਨਕੁ ਮੰਨ ਮੇਰੇ ਸਦਾ ਰਹੁ ਹਰਿ ਨਾਲੇ ॥੨॥
नानक म्हणतात की हे मना! परमेश्वरावर सदैव श्रद्धा ठेव. ॥ २ ॥
ਸਾਚੇ ਸਾਹਿਬਾ ਕਿਆ ਨਾਹੀ ਘਰਿ ਤੇਰੈ ॥
हे माझ्या स्वामी! असे काय आहे तुझ्याकडे नाही?
ਘਰਿ ਤ ਤੇਰੈ ਸਭੁ ਕਿਛੁ ਹੈ ਜਿਸੁ ਦੇਹਿ ਸੁ ਪਾਵਏ ॥
हे परमेश्वरा! तुझ्या घरात सर्व काही आहे, पण तू जे देतो तेच तुझ्या भक्ताला मिळते.
ਸਦਾ ਸਿਫਤਿ ਸਲਾਹ ਤੇਰੀ ਨਾਮੁ ਮਨਿ ਵਸਾਵਏ ॥
हे परमेश्वरा! जे नेहमी तुझे गुणगान गातात, त्यांच्या मनात सदैव तुझे नाम वास करते.
ਨਾਮੁ ਜਿਨ ਕੈ ਮਨਿ ਵਸਿਆ ਵਾਜੇ ਸਬਦ ਘਨੇਰੇ ॥
ज्यांच्या मनात तुझे नाम वास करते, त्यांच्या हृदयात दैवी शब्दाचा नाद घुमतो.
ਕਹੈ ਨਾਨਕੁ ਸਚੇ ਸਾਹਿਬ ਕਿਆ ਨਾਹੀ ਘਰਿ ਤੇਰੈ ॥੩॥
नानक म्हणतात की हे माझ्या स्वामी ! असे काय आहे तुझ्याकडे नाही? ॥ ३॥
ਸਾਚਾ ਨਾਮੁ ਮੇਰਾ ਆਧਾਰੋ ॥
परमेश्वराचे नाम हाच माझा आधार आहे.
ਸਾਚੁ ਨਾਮੁ ਅਧਾਰੁ ਮੇਰਾ ਜਿਨਿ ਭੁਖਾ ਸਭਿ ਗਵਾਈਆ ॥
परमेश्वराचे नाम हाच माझा आधार आहे, ज्याने सर्व प्रकारची भूक (सांसारिक मोह) नाहीशी केली आहे.
ਕਰਿ ਸਾਂਤਿ ਸੁਖ ਮਨਿ ਆਇ ਵਸਿਆ ਜਿਨਿ ਇਛਾ ਸਭਿ ਪੁਜਾਈਆ ॥
ज्या नामाने माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत, ते नाम माझ्या मनाला शांती आणि आनंदाने देतो.
ਸਦਾ ਕੁਰਬਾਣੁ ਕੀਤਾ ਗੁਰੂ ਵਿਟਹੁ ਜਿਸ ਦੀਆ ਏਹਿ ਵਡਿਆਈਆ ॥
ज्या गुरूंनी मला हे मोठेपण दिले, मी त्यांना समर्पित आहे.
ਕਹੈ ਨਾਨਕੁ ਸੁਣਹੁ ਸੰਤਹੁ ਸਬਦਿ ਧਰਹੁ ਪਿਆਰੋ ॥
नानक म्हणतात की हे संतांनो ऐका, गुरूंच्या वचनाविषयीचे प्रेम तुमच्या हृदयात सदैव असू द्या.
ਸਾਚਾ ਨਾਮੁ ਮੇਰਾ ਆਧਾਰੋ ॥੪॥
परमेश्वराचे शाश्वत नाम माझ्या जीवनाचा आधार आहे. ॥४॥
ਵਾਜੇ ਪੰਚ ਸਬਦ ਤਿਤੁ ਘਰਿ ਸਭਾਗੈ ॥
त्या भाग्यवान हृदयारूपी घरात रबाब, पखावज, ताल,घुंगरू आणि शंख हे (अवर्णनीय शब्द) पाच प्रकारचे आवाज गुंजतात.
ਘਰਿ ਸਭਾਗੈ ਸਬਦ ਵਾਜੇ ਕਲਾ ਜਿਤੁ ਘਰਿ ਧਾਰੀਆ ॥
हे परमेश्वरा ! ते हृदय धन्य आहे ज्यामध्ये तू तुझी शक्ती प्रस्थापित केली आहेस, त्या हृदयात दैवी संगीत सतत वाजत असल्याचे जाणवते.
ਪੰਚ ਦੂਤ ਤੁਧੁ ਵਸਿ ਕੀਤੇ ਕਾਲੁ ਕੰਟਕੁ ਮਾਰਿਆ ॥
हे परमेश्वरा! तू त्या व्यक्तीचे पाचही भुते (वासना, क्रोध, लोभ, आसक्ती आणि अहंकार) नियंत्रणात आणले आहेत आणि त्याच्या मनातील मृत्यूचे भय दूर केले आहे.
ਧੁਰਿ ਕਰਮਿ ਪਾਇਆ ਤੁਧੁ ਜਿਨ ਕਉ ਸਿ ਨਾਮਿ ਹਰਿ ਕੈ ਲਾਗੇ ॥
केवळ तेच लोक परमेश्वराचे नामस्मरण करतात, ज्यांच्या नशिबात सुरुवातीपासूनच परमेश्वराच्या नामाचा आशीर्वाद लिहिलेला असतो.
ਕਹੈ ਨਾਨਕੁ ਤਹ ਸੁਖੁ ਹੋਆ ਤਿਤੁ ਘਰਿ ਅਨਹਦ ਵਾਜੇ ॥੫॥
नानक म्हणतात की जेव्हा भक्ताच्या हृदयात अखंड दैवी संगीताचा सुर वाजत असतो, तेव्हा त्याला आनंदाची प्राप्ती होते. ॥५॥
ਸਾਚੀ ਲਿਵੈ ਬਿਨੁ ਦੇਹ ਨਿਮਾਣੀ ॥
खऱ्या भक्तीशिवाय हे मानवी शरीर पूर्णपणे असहाय्य आहे.
ਦੇਹ ਨਿਮਾਣੀ ਲਿਵੈ ਬਾਝਹੁ ਕਿਆ ਕਰੇ ਵੇਚਾਰੀਆ ॥
हे सृष्टी निर्माता ! तुझ्याशिवाय कोणीही सर्वशक्तिमान नाही; कृपया दया करा.
ਤੁਧੁ ਬਾਝੁ ਸਮਰਥ ਕੋਇ ਨਾਹੀ ਕ੍ਰਿਪਾ ਕਰਿ ਬਨਵਾਰੀਆ ॥
परमेश्वराशिवाय या शरीराला दुसरा आधार नाही, केवळ परमेश्वराच्या ध्यानात गुंतून ते सुधारले जाऊ शकते.
ਏਸ ਨਉ ਹੋਰੁ ਥਾਉ ਨਾਹੀ ਸਬਦਿ ਲਾਗਿ ਸਵਾਰੀਆ ॥
नानक म्हणतात की हे असहाय्य शरीर परमेश्वराच्या भक्तीशिवाय काय करू शकते? ॥६॥
ਕਹੈ ਨਾਨਕੁ ਲਿਵੈ ਬਾਝਹੁ ਕਿਆ ਕਰੇ ਵੇਚਾਰੀਆ ॥੬॥
प्रत्येकजण आनंदाबद्दल बोलतो, परंतु परमानंद गुरूमुळेच कळतो.
ਆਨੰਦੁ ਆਨੰਦੁ ਸਭੁ ਕੋ ਕਹੈ ਆਨੰਦੁ ਗੁਰੂ ਤੇ ਜਾਣਿਆ ॥
माझ्या प्रिय मित्रांनो! जेव्हा गुरू आपल्या प्रिय सेवकांवर (भक्तावर) कृपा करतात तेव्हा गुरूकडून त्या सेवकाला खरा आनंद प्राप्त होतो.
ਜਾਣਿਆ ਆਨੰਦੁ ਸਦਾ ਗੁਰ ਤੇ ਕ੍ਰਿਪਾ ਕਰੇ ਪਿਆਰਿਆ ॥
गुरूंच्या कृपेने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्याला आध्यात्मिक बुद्धीचे बरे करणारे मलम परमेश्वर आपल्या आशीर्वादाच्या रूपात देतात.
ਕਰਿ ਕਿਰਪਾ ਕਿਲਵਿਖ ਕਟੇ ਗਿਆਨ ਅੰਜਨੁ ਸਾਰਿਆ ॥
ज्यांच्या मनातून प्रापंचिक आसक्ती मोह नष्ट झाला आहे, परमेश्वराने त्यांचे जीवन शब्दांतून सुंदर केले आहे.
ਅੰਦਰਹੁ ਜਿਨ ਕਾ ਮੋਹੁ ਤੁਟਾ ਤਿਨ ਕਾ ਸਬਦੁ ਸਚੈ ਸਵਾਰਿਆ ॥
नानक म्हणतात की हाच खरा आनंद आहे, ज्या आनंदाचे ज्ञान मला गुरुकडून प्राप्त झाले आहे. ॥७ ॥
ਕਹੈ ਨਾਨਕੁ ਏਹੁ ਅਨੰਦੁ ਹੈ ਆਨੰਦੁ ਗੁਰ ਤੇ ਜਾਣਿਆ ॥੭॥