Page 88
ਸਲੋਕੁ ਮਃ ੩ ॥
श्लोक महला ३॥
ਸਤਿਗੁਰੁ ਸੇਵੇ ਆਪਣਾ ਸੋ ਸਿਰੁ ਲੇਖੈ ਲਾਇ ॥
जे सद्गुरूंच्या शिकवणींचे पालन करतात ते मानवी जीवनाचे ध्येय साध्य करतात.
ਵਿਚਹੁ ਆਪੁ ਗਵਾਇ ਕੈ ਰਹਨਿ ਸਚਿ ਲਿਵ ਲਾਇ ॥
अशी व्यक्ती आपल्या अहंकाराचा नाश करून सत्याच्या रूपात परमेश्वराच्या प्रेमात लीन राहते.
ਸਤਿਗੁਰੁ ਜਿਨੀ ਨ ਸੇਵਿਓ ਤਿਨਾ ਬਿਰਥਾ ਜਨਮੁ ਗਵਾਇ ॥
जे सद्गुरूंच्या शिकवणुकीचे पालन करत नाही, त्यांनी आपले जीवन व्यर्थ घालविले आहे.
ਨਾਨਕ ਜੋ ਤਿਸੁ ਭਾਵੈ ਸੋ ਕਰੇ ਕਹਣਾ ਕਿਛੂ ਨ ਜਾਇ ॥੧॥
हे नानक! काहीही सांगता येत नाही कारण परमेश्वराला जे आवडते तेच तो करतो. ॥१॥
ਮਃ ੩ ॥
श्लोक महला ३॥
ਮਨੁ ਵੇਕਾਰੀ ਵੇੜਿਆ ਵੇਕਾਰਾ ਕਰਮ ਕਮਾਇ ॥
वाईट गोष्टीत अडकलेले मन, वाईट कर्म करत राहतो.
ਦੂਜੈ ਭਾਇ ਅਗਿਆਨੀ ਪੂਜਦੇ ਦਰਗਹ ਮਿਲੈ ਸਜਾਇ ॥
सांसारिक संपत्ती आणि सामर्थ्याबद्दल प्रेमाने परमेश्वराची उपासना करणारे आध्यात्मिकदृष्ट्या अज्ञानी व्यक्तींना त्याच्या दरबारात शिक्षा (वारंवार जन्म-मृत्यू) भोगावी लागते.
ਆਤਮ ਦੇਉ ਪੂਜੀਐ ਬਿਨੁ ਸਤਿਗੁਰ ਬੂਝ ਨ ਪਾਇ ॥
म्हणून आपण केवळ परमेश्वराचीच उपासना केली पाहिजे, परंतु सद्गुरूंच्या शिकवणीचे पालन केल्याशिवाय मनुष्य हे ज्ञान प्राप्त करू शकत नाही.
ਜਪੁ ਤਪੁ ਸੰਜਮੁ ਭਾਣਾ ਸਤਿਗੁਰੂ ਕਾ ਕਰਮੀ ਪਲੈ ਪਾਇ ॥
सद्गुरूंच्या शिकवणीनुसार जीवन जगणे हीच खरी उपासना, तपश्चर्या आणि साधेपणा आहे, परंतु तसे करण्याची क्षमता तेव्हाच प्राप्त होते जेव्हा परमेश्वराची व्यक्तीवर कृपा असते.
ਨਾਨਕ ਸੇਵਾ ਸੁਰਤਿ ਕਮਾਵਣੀ ਜੋ ਹਰਿ ਭਾਵੈ ਸੋ ਥਾਇ ਪਾਇ ॥੨॥
हे नानक! गुरूंची सेवा म्हणजे त्यांच्या शिकवणींचे पूर्ण लक्ष देऊन पालन करणे, परंतु केवळ तीच सेवा स्वीकार्य आहे जी परमेश्वराला प्रसन्न करते. ॥२॥
ਪਉੜੀ ॥
पउडी ॥
ਹਰਿ ਹਰਿ ਨਾਮੁ ਜਪਹੁ ਮਨ ਮੇਰੇ ਜਿਤੁ ਸਦਾ ਸੁਖੁ ਹੋਵੈ ਦਿਨੁ ਰਾਤੀ ॥
हे माझ्या मना! ज्याच्याकडून रात्रंदिवस आनंद मिळतो त्या परमेश्वराच्या नामाची सदैव पूजा करा.
ਹਰਿ ਹਰਿ ਨਾਮੁ ਜਪਹੁ ਮਨ ਮੇਰੇ ਜਿਤੁ ਸਿਮਰਤ ਸਭਿ ਕਿਲਵਿਖ ਪਾਪ ਲਹਾਤੀ ॥
हे माझ्या मना! तू परमेश्वरानामाचे गुणगान गायले पाहिजे, ज्याचे स्मरण केल्याने तुमचे सर्व पाप आणि मनातील वाईट विचार नष्ट होतात.
ਹਰਿ ਹਰਿ ਨਾਮੁ ਜਪਹੁ ਮਨ ਮੇਰੇ ਜਿਤੁ ਦਾਲਦੁ ਦੁਖ ਭੁਖ ਸਭ ਲਹਿ ਜਾਤੀ ॥
हे माझ्या मना! तू नेहमी प्रेमळ भक्तीने परमेश्वराचे नामस्मरण करा, जेणेकरून सर्व दारिद्र्य, वेदना आणि इच्छा दूर होतील.
ਹਰਿ ਹਰਿ ਨਾਮੁ ਜਪਹੁ ਮਨ ਮੇਰੇ ਮੁਖਿ ਗੁਰਮੁਖਿ ਪ੍ਰੀਤਿ ਲਗਾਤੀ ॥
हे माझ्या मना! तू परमेश्वराचे सदैव भक्तीभावाने स्मरण कर, जेणेकरून गुरूंच्या उपदेशाने तुझ्यात परमेश्वराविषयी प्रेम निर्माण होईल.
ਜਿਤੁ ਮੁਖਿ ਭਾਗੁ ਲਿਖਿਆ ਧੁਰਿ ਸਾਚੈ ਹਰਿ ਤਿਤੁ ਮੁਖਿ ਨਾਮੁ ਜਪਾਤੀ ॥੧੩॥
ज्यांचे नाशिवात हे पूर्वनिश्चित आहे, त्यांनाच परमेश्वर प्रेमाने आणि भक्तीने स्मरण करण्याची प्रेरणा देतात.॥१३॥
ਸਲੋਕ ਮਃ ੩ ॥:
श्लोक महला ३॥
ਸਤਿਗੁਰੁ ਜਿਨੀ ਨ ਸੇਵਿਓ ਸਬਦਿ ਨ ਕੀਤੋ ਵੀਚਾਰੁ ॥
ज्यांनी सद्गुरूंची सेवा केली नाही (त्यांच्या शिकवणुकीचे पालन केले) आणि त्यांनी त्याच्या शब्दाद्वारे परमेश्वराचे नामस्मरण केले नाही,
ਅੰਤਰਿ ਗਿਆਨੁ ਨ ਆਇਓ ਮਿਰਤਕੁ ਹੈ ਸੰਸਾਰਿ ॥
त्याच्या हृदयात दैवी ज्ञानाचा प्रकाश नसतो आणि तो या जगात आध्यात्मिकरित्या मृत व्यक्तीसारखा आहे.
ਲਖ ਚਉਰਾਸੀਹ ਫੇਰੁ ਪਇਆ ਮਰਿ ਜੰਮੈ ਹੋਇ ਖੁਆਰੁ ॥
ते कोट्यावधी प्रजातींमधून जातात आणि जन्म आणि मृत्यूच्या अंतहीन चक्रात त्यांचा नाश होतो.
ਸਤਿਗੁਰ ਕੀ ਸੇਵਾ ਸੋ ਕਰੇ ਜਿਸ ਨੋ ਆਪਿ ਕਰਾਏ ਸੋਇ ॥
केवळ तेच व्यक्ती सद्गुरूंच्या शिकवणुकीचे पालन केले आहे, ज्यांना परमेश्वर स्वतः असे करण्यास प्रेरित करतो.
ਸਤਿਗੁਰ ਵਿਚਿ ਨਾਮੁ ਨਿਧਾਨੁ ਹੈ ਕਰਮਿ ਪਰਾਪਤਿ ਹੋਇ ॥
परमेश्वराच्या नामाचा खजिना फक्त सद्गुरूकडे आहे, जे परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होते.
ਸਚਿ ਰਤੇ ਗੁਰ ਸਬਦ ਸਿਉ ਤਿਨ ਸਚੀ ਸਦਾ ਲਿਵ ਹੋਇ ॥
जे लोक गुरूंच्या वचनाने खऱ्या परमेश्वराच्या नामात तल्लीन राहतात, त्यांचे लक्ष सदैव परमेश्वरावर केंद्रित असते.
ਨਾਨਕ ਜਿਸ ਨੋ ਮੇਲੇ ਨ ਵਿਛੁੜੈ ਸਹਜਿ ਸਮਾਵੈ ਸੋਇ ॥੧॥
हे नानक! जो माणूस स्वतःला परमेश्वराशी एकरूप करतो, तो कधीही परमेश्वरापासून विभक्त होत नाही आणि नेहमी आध्यात्मिकरित्या संतुलित राहतो. १॥
ਮਃ ੩ ॥
महला ३॥
ਸੋ ਭਗਉਤੀ ਜੋੁ ਭਗਵੰਤੈ ਜਾਣੈ ॥
केवळ तोच मनुष्य खरा भक्त आहे ज्याला परमेश्वराची जाणीव होते.
ਗੁਰ ਪਰਸਾਦੀ ਆਪੁ ਪਛਾਣੈ ॥
गुरूंच्या कृपेने त्याला स्वतःचा साक्षात्कार होतो.
ਧਾਵਤੁ ਰਾਖੈ ਇਕਤੁ ਘਰਿ ਆਣੈ ॥
तो त्याच्या भटक्या मनावर नियंत्रण ठेवतो आणि त्याला स्वतःमध्ये स्थिर करतो.
ਜੀਵਤੁ ਮਰੈ ਹਰਿ ਨਾਮੁ ਵਖਾਣੈ ॥
तो सांसारिक बाबींमध्ये रसहीन राहतो आणि जिवंत असतानाही स्वत:ला मेल्यासारखे समजून हरिनामाचा जप करतो.
ਐਸਾ ਭਗਉਤੀ ਉਤਮੁ ਹੋਇ ॥
असा भक्त अत्यंत श्रेष्ठ आहे.
ਨਾਨਕ ਸਚਿ ਸਮਾਵੈ ਸੋਇ ॥੨॥
हे नानक! तो सत्यात (परमेश्वरात) विलीन होतो.॥२॥
ਮਃ ੩ ॥
महला ३॥
ਅੰਤਰਿ ਕਪਟੁ ਭਗਉਤੀ ਕਹਾਏ ॥
ज्याच्या अंत:करणात कपट आहे आणि तो स्वतःला खरा भक्त म्हणवतो.
ਪਾਖੰਡਿ ਪਾਰਬ੍ਰਹਮੁ ਕਦੇ ਨ ਪਾਏ ॥
या ढोंगीपणामुळे तो कधीही परमेश्वराची प्राप्ती करणार नाही.
ਪਰ ਨਿੰਦਾ ਕਰੇ ਅੰਤਰਿ ਮਲੁ ਲਾਏ ॥
जो इतरांवर टीका करतो तो स्वतःचे हृदय दूषित करतो.
ਬਾਹਰਿ ਮਲੁ ਧੋਵੈ ਮਨ ਕੀ ਜੂਠਿ ਨ ਜਾਏ ॥
आंघोळ केल्याने तो आपल्या शरीराच्या बाहेरील घाण साफ करतो, परंतु त्याच्या मनाची अशुद्धता दूर होत नाही.
ਸਤਸੰਗਤਿ ਸਿਉ ਬਾਦੁ ਰਚਾਏ ॥
जो साधु-संताशी वादविवाद करतो.
ਅਨਦਿਨੁ ਦੁਖੀਆ ਦੂਜੈ ਭਾਇ ਰਚਾਏ ॥
तो द्वैतामध्ये लीन होऊन रात्रंदिवस दुःखी राहतो.
ਹਰਿ ਨਾਮੁ ਨ ਚੇਤੈ ਬਹੁ ਕਰਮ ਕਮਾਏ ॥
तो परमेश्वराच्या नावाचा विचार करत नाही आणि इतर सर्व प्रकारचे विधी करत राहतो.
ਪੂਰਬ ਲਿਖਿਆ ਸੁ ਮੇਟਣਾ ਨ ਜਾਏ ॥
त्याच्या नशिबात त्याच्या मागच्या जन्माच्या कर्माने जे काही लिहिले आहे ते पुसता येत नाही.
ਨਾਨਕ ਬਿਨੁ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵੇ ਮੋਖੁ ਨ ਪਾਏ ॥੩॥
हे नानक! तो मनुष्य सद्गुरूंच्या उपदेशाचा विचार केल्याशिवाय मायेच्या प्रेमापासून मुक्त होऊ शकत नाही. ॥३॥
ਪਉੜੀ ॥
पउडी ॥
ਸਤਿਗੁਰੁ ਜਿਨੀ ਧਿਆਇਆ ਸੇ ਕੜਿ ਨ ਸਵਾਹੀ ॥
सद्गुरूंचे स्मरण करणारा व्यक्ती जळून राख होत नाही.
ਸਤਿਗੁਰੁ ਜਿਨੀ ਧਿਆਇਆ ਸੇ ਤ੍ਰਿਪਤਿ ਅਘਾਹੀ ॥
जे सद्गुरूंचे प्रेमळपणे स्मरण करतात, ते तृप्त व समाधानी असतात.
ਸਤਿਗੁਰੁ ਜਿਨੀ ਧਿਆਇਆ ਤਿਨ ਜਮ ਡਰੁ ਨਾਹੀ ॥
जे सद्गुरूंचे प्रेमळ भक्तीने स्मरण करतात त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही.