Guru Granth Sahib Translation Project

Guru Granth Sahib Marathi Page 101

Page 101

ਜੋ ਜੋ ਪੀਵੈ ਸੋ ਤ੍ਰਿਪਤਾਵੈ ॥ परमेश्वराचे नामरूपी अमृत जो कोणी पितो, त्याला आनंद प्राप्त होतो.
ਅਮਰੁ ਹੋਵੈ ਜੋ ਨਾਮ ਰਸੁ ਪਾਵੈ ॥ परमेश्वराचे नामरूपी अमृत ज्याला प्राप्त होते, तो अमर होतो.
ਨਾਮ ਨਿਧਾਨ ਤਿਸਹਿ ਪਰਾਪਤਿ ਜਿਸੁ ਸਬਦੁ ਗੁਰੂ ਮਨਿ ਵੂਠਾ ਜੀਉ ॥੨॥ ज्याच्या हृदयात गुरूचा वास असतो, त्यालाच परमेश्वराच्या नामाचा खजिना प्राप्त होतो. ॥२॥
ਜਿਨਿ ਹਰਿ ਰਸੁ ਪਾਇਆ ਸੋ ਤ੍ਰਿਪਤਿ ਅਘਾਨਾ ॥ परमेश्वराचे नामरूपी अमृताची प्राप्ती केली तो तृप्त होतो.
ਜਿਨਿ ਹਰਿ ਸਾਦੁ ਪਾਇਆ ਸੋ ਨਾਹਿ ਡੁਲਾਨਾ ॥ परमेश्वराचे नामरूपी अमृताचा आस्वाद घेणारा माणूस पुन्हा कधीच डगमगत नाही.
ਤਿਸਹਿ ਪਰਾਪਤਿ ਹਰਿ ਹਰਿ ਨਾਮਾ ਜਿਸੁ ਮਸਤਕਿ ਭਾਗੀਠਾ ਜੀਉ ॥੩॥ ज्याच्या नशिबात परमेश्वराच्या नामाची प्राप्ती लिहिली असते त्यालाच परमेश्वराचे नाम प्राप्त होते. ॥३॥
ਹਰਿ ਇਕਸੁ ਹਥਿ ਆਇਆ ਵਰਸਾਣੇ ਬਹੁਤੇਰੇ ॥ हे नानक! परमेश्वर हा केवळ गुरूंना प्राप्त झाला आहे,ज्याचा फायदा आपल्यासारख्या भक्तांनाही मिळतो.
ਤਿਸੁ ਲਗਿ ਮੁਕਤੁ ਭਏ ਘਣੇਰੇ ॥ गुरूंच्या आश्रय घेतल्याने अनेक लोक मायेच्या बंधनातून मुक्त होतात.
ਨਾਮੁ ਨਿਧਾਨਾ ਗੁਰਮੁਖਿ ਪਾਈਐ ਕਹੁ ਨਾਨਕ ਵਿਰਲੀ ਡੀਠਾ ਜੀਉ ॥੪॥੧੫॥੨੨॥ परमेश्वराच्या नामाची संपत्ती गुरूकडूनच मिळते. हे नानक! केवळ दुर्लभ लोकांनाच परमेश्वराच्या नामाची ही संपत्ती प्राप्त होते. ॥४॥१५॥२२॥
ਮਾਝ ਮਹਲਾ ੫ ॥ माझ महला ५ ॥
ਨਿਧਿ ਸਿਧਿ ਰਿਧਿ ਹਰਿ ਹਰਿ ਹਰਿ ਮੇਰੈ ॥ परमेश्वराचे हे नाम माझ्यासाठी माझा खजिना, सिद्धी आणि रिद्धी आहे.
ਜਨਮੁ ਪਦਾਰਥੁ ਗਹਿਰ ਗੰਭੀਰੈ ॥ अथांग आणि चिरंतन परमेश्वराच्या कृपेने मला दुर्लभ मानव जन्म मिळाला आहे.
ਲਾਖ ਕੋਟ ਖੁਸੀਆ ਰੰਗ ਰਾਵੈ ਜੋ ਗੁਰ ਲਾਗਾ ਪਾਈ ਜੀਉ ॥੧॥ गुरूंच्या चरणी सेवेत मग्न असलेला व्यक्ती लाखो सुख आणि आनंद उपभोगतो. ॥१॥
ਦਰਸਨੁ ਪੇਖਤ ਭਏ ਪੁਨੀਤਾ ॥ गुरूच्या दर्शनाने व्यक्ती शुद्ध होतो.
ਸਗਲ ਉਧਾਰੇ ਭਾਈ ਮੀਤਾ ॥ माझ्या सर्व बंधू आणि मित्रांनो! गुरूंनी इंद्रियांना विकारांपासून वाचवले आहे.
ਅਗਮ ਅਗੋਚਰੁ ਸੁਆਮੀ ਅਪੁਨਾ ਗੁਰ ਕਿਰਪਾ ਤੇ ਸਚੁ ਧਿਆਈ ਜੀਉ ॥੨॥ गुरूंच्या कृपेने मी माझ्या अगम्य, अदृश्य आणि महान सत्य परमेश्वराचे चिंतन करतो. ॥२॥
ਜਾ ਕਉ ਖੋਜਹਿ ਸਰਬ ਉਪਾਏ ॥ ज्या परमेश्वराने सर्व प्राणी निर्माण केले , मनुष्य त्या परमेश्वराला शोधत राहतात
ਵਡਭਾਗੀ ਦਰਸਨੁ ਕੋ ਵਿਰਲਾ ਪਾਏ ॥ पण त्याचे दर्शन दुर्लभ भाग्यवान व्यक्तीलाच मिळते.
ਊਚ ਅਪਾਰ ਅਗੋਚਰ ਥਾਨਾ ਓਹੁ ਮਹਲੁ ਗੁਰੂ ਦੇਖਾਈ ਜੀਉ ॥੩॥ परमेश्वराचे निवासस्थान हे परम, अपार आणि अदृश्य आहे आणि गुरूंनी मला परमेश्वराच्या निवासाचे दर्शन दिले आहे. ॥३॥
ਗਹਿਰ ਗੰਭੀਰ ਅੰਮ੍ਰਿਤ ਨਾਮੁ ਤੇਰਾ ॥ हे परमेश्वरा, तू दयाळू आणि गंभीर आहेस, तुझे नाव अमृतरूप आहे.
ਮੁਕਤਿ ਭਇਆ ਜਿਸੁ ਰਿਦੈ ਵਸੇਰਾ ॥ ज्याच्या हृदयात परमेश्वर वास करतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो.
ਗੁਰਿ ਬੰਧਨ ਤਿਨ ਕੇ ਸਗਲੇ ਕਾਟੇ ਜਨ ਨਾਨਕ ਸਹਜਿ ਸਮਾਈ ਜੀਉ ॥੪॥੧੬॥੨੩॥ हे नानक! ज्याचे बंधन गुरूंनी तोडले आहे तो सहज परमेश्वरात विलीन होतो. ॥४॥ १६॥२३॥
ਮਾਝ ਮਹਲਾ ੫ ॥ माझ महला ५ ॥
ਪ੍ਰਭ ਕਿਰਪਾ ਤੇ ਹਰਿ ਹਰਿ ਧਿਆਵਉ ॥ परमेश्वराच्या कृपेनेच मी भगवान हरीचे ध्यान करतो.
ਪ੍ਰਭੂ ਦਇਆ ਤੇ ਮੰਗਲੁ ਗਾਵਉ ॥ परमेश्वराच्या कृपेनेच मी त्याचे गुणगान गातो.
ਊਠਤ ਬੈਠਤ ਸੋਵਤ ਜਾਗਤ ਹਰਿ ਧਿਆਈਐ ਸਗਲ ਅਵਰਦਾ ਜੀਉ ॥੧॥ उठतांना-झोपतांना, प्रत्येक क्षणी, प्रत्येक अवस्थेत आपण परमेश्वराचे नामस्मरण केले पाहिजे.॥१॥
ਨਾਮੁ ਅਉਖਧੁ ਮੋ ਕਉ ਸਾਧੂ ਦੀਆ ॥ संतांनी मला नामरूपात औषध दिले आहे
ਕਿਲਬਿਖ ਕਾਟੇ ਨਿਰਮਲੁ ਥੀਆ ॥ त्यामुळे माझी सर्व पापे दूर झाली आहेत आणि मी पवित्र झालो आहे.
ਅਨਦੁ ਭਇਆ ਨਿਕਸੀ ਸਭ ਪੀਰਾ ਸਗਲ ਬਿਨਾਸੇ ਦਰਦਾ ਜੀਉ ॥੨॥ माझे सर्व कष्ट नाहीसे होऊन माझे दुःख संपले आहे आणि मला परम सुख प्राप्त झाले आहे. ॥२॥
ਜਿਸ ਕਾ ਅੰਗੁ ਕਰੇ ਮੇਰਾ ਪਿਆਰਾ ॥ माझ्या प्रिय स्वामी-परमेश्वर ज्याची मदत करतो
ਸੋ ਮੁਕਤਾ ਸਾਗਰ ਸੰਸਾਰਾ ॥ तो सांसारिक मोहापासून मुक्त होतो.
ਸਤਿ ਕਰੇ ਜਿਨਿ ਗੁਰੂ ਪਛਾਤਾ ਸੋ ਕਾਹੇ ਕਉ ਡਰਦਾ ਜੀਉ ॥੩॥ ज्याला गुरुचे खरे रूप समजले आहे त्याला मृत्यूची भीती का वाटावी? ॥३॥
ਜਬ ਤੇ ਸਾਧੂ ਸੰਗਤਿ ਪਾਏ ॥ जेव्हापासून मला गुरूंचा सहवास लाभला आहे,
ਗੁਰ ਭੇਟਤ ਹਉ ਗਈ ਬਲਾਏ ॥ तेव्हापासून माझ्यातील अहंकाराचे भूत निघून गेले आहे.
ਸਾਸਿ ਸਾਸਿ ਹਰਿ ਗਾਵੈ ਨਾਨਕੁ ਸਤਿਗੁਰ ਢਾਕਿ ਲੀਆ ਮੇਰਾ ਪੜਦਾ ਜੀਉ ॥੪॥੧੭॥੨੪॥ हे परमेश्वरा! आता नानक प्रत्येक श्वासाने परमेश्वराचे गुणगान गातात. ॥४॥१७॥२४॥
ਮਾਝ ਮਹਲਾ ੫ ॥ माझ महला ५ ॥
ਓਤਿ ਪੋਤਿ ਸੇਵਕ ਸੰਗਿ ਰਾਤਾ ॥ ज्याप्रमाणे कापडाचा धागा एकमेकांत विणला जातो, त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्या सेवकाशी एकरूप राहतो.
ਪ੍ਰਭ ਪ੍ਰਤਿਪਾਲੇ ਸੇਵਕ ਸੁਖਦਾਤਾ ॥ मनुष्याला सुख देणारा परमेश्वर आपल्या सेवकांचे रक्षण करतो.
ਪਾਣੀ ਪਖਾ ਪੀਸਉ ਸੇਵਕ ਕੈ ਠਾਕੁਰ ਹੀ ਕਾ ਆਹਰੁ ਜੀਉ ॥੧॥ हे परमेश्वरा ! तुझ्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या भक्तांच्या घरी मी पाणी, पंखा आणि पीठ दळतो.॥१॥
ਕਾਟਿ ਸਿਲਕ ਪ੍ਰਭਿ ਸੇਵਾ ਲਾਇਆ ॥ हे परमेश्वरा ! तू माझ्या वासनेचा फास तोडून मला तुझी सेवा करण्यास प्रवृत्त केले आहेस.
ਹੁਕਮੁ ਸਾਹਿਬ ਕਾ ਸੇਵਕ ਮਨਿ ਭਾਇਆ ॥ त्यामुळे परमेश्वराची आज्ञा सेवकाला चांगली वाटते.
ਸੋਈ ਕਮਾਵੈ ਜੋ ਸਾਹਿਬ ਭਾਵੈ ਸੇਵਕੁ ਅੰਤਰਿ ਬਾਹਰਿ ਮਾਹਰੁ ਜੀਉ ॥੨॥ सेवक फक्त तेच काम करतो जेपरमेश्वरा ला आवडते. त्यामुळे सेवक आतून व बाहेरून सेवा करण्यात परिपक्व होतो. ॥२॥
ਤੂੰ ਦਾਨਾ ਠਾਕੁਰੁ ਸਭ ਬਿਧਿ ਜਾਨਹਿ ॥ हे परमेश्वरा! तू सर्व बाबतीत ज्ञानी आणि सर्वज्ञ आहेस.


© 2017 SGGS ONLINE
error: Content is protected !!
Scroll to Top