Page 110
ਸੇਵਾ ਸੁਰਤਿ ਸਬਦਿ ਚਿਤੁ ਲਾਏ ॥
मग ती व्यक्ती परमेश्वराच्या सेवेकडे आपले लक्ष घालते आणि आपले मन त्याच्या शब्दाशी जोडते.
ਹਉਮੈ ਮਾਰਿ ਸਦਾ ਸੁਖੁ ਪਾਇਆ ਮਾਇਆ ਮੋਹੁ ਚੁਕਾਵਣਿਆ ॥੧॥
अहंकाराचा त्याग करून तो सदैव सुखाची प्राप्ती करतो आणि मायेची आसक्ती दूर करतो. ॥ १॥
ਹਉ ਵਾਰੀ ਜੀਉ ਵਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਕੈ ਬਲਿਹਾਰਣਿਆ ॥
मी माझे शरीर आणि मन माझ्या सद्गुरूंना समर्पित केले आहे.
ਗੁਰਮਤੀ ਪਰਗਾਸੁ ਹੋਆ ਜੀ ਅਨਦਿਨੁ ਹਰਿ ਗੁਣ ਗਾਵਣਿਆ ॥੧॥ ਰਹਾਉ ॥
कारण गुरूंच्या उपदेशाने त्याच्या हृदयात परमेश्वराचा प्रकाश निर्माण होतो. ती व्यक्ती रोज परमेश्वराची स्तुती करत असते. ॥१॥रहाउ॥
ਤਨੁ ਮਨੁ ਖੋਜੇ ਤਾ ਨਾਉ ਪਾਏ ॥
जेव्हा मनुष्य त्याच्या शरीराने आणि मनाने त्याचा शोध घेतो तेव्हा त्याला परमेश्वराचे नाम प्राप्त होते.
ਧਾਵਤੁ ਰਾਖੈ ਠਾਕਿ ਰਹਾਏ ॥
तो त्याच्या भटक्या मनाला स्थिर करतो आणि आपल्या नियंत्रणात आणतो.
ਗੁਰ ਕੀ ਬਾਣੀ ਅਨਦਿਨੁ ਗਾਵੈ ਸਹਜੇ ਭਗਤਿ ਕਰਾਵਣਿਆ ॥੨॥
तो रात्रंदिवस गुरूंचे शब्द गातो आणि सहज परमेश्वराच्या भक्तीत मग्न राहतो. ॥२॥
ਇਸੁ ਕਾਇਆ ਅੰਦਰਿ ਵਸਤੁ ਅਸੰਖਾ ॥
जेव्हा या शरीरात असीम गुण असलेली नामरूपी वस्तू एखाद्याला मिळते
ਗੁਰਮੁਖਿ ਸਾਚੁ ਮਿਲੈ ਤਾ ਵੇਖਾ ॥
तेव्हा त्याला परमेश्वराचे दर्शन प्राप्त होते.
ਨਉ ਦਰਵਾਜੇ ਦਸਵੈ ਮੁਕਤਾ ਅਨਹਦ ਸਬਦੁ ਵਜਾਵਣਿਆ ॥੩॥
शरीराच्या रूपातील घराला डोळे, कान, नाक, तोंड इत्यादी नऊ दरवाजे असतात. मन या दारातून बाहेर भटकत राहते. जेव्हा तो दुर्गुण आणि मोहांपासून मुक्त होऊन शुद्ध होतो तेव्हा तो दहाव्या दारात प्रवेश करतो. मग अनहद हा शब्द शुद्ध मनात खेळू लागतो. परमेश्वर नेहमी सत्य आहे आणि त्याचा महिमा देखील सत्य आहे. ॥३॥
ਸਚਾ ਸਾਹਿਬੁ ਸਚੀ ਨਾਈ ॥
परमेश्वर सदैव सत्य आहे आणि त्याची महिमाही सत्य आहे.
ਗੁਰ ਪਰਸਾਦੀ ਮੰਨਿ ਵਸਾਈ ॥
गुरूंच्या कृपेनेच परमेश्वर मनात येतो आणि वास करतो.
ਅਨਦਿਨੁ ਸਦਾ ਰਹੈ ਰੰਗਿ ਰਾਤਾ ਦਰਿ ਸਚੈ ਸੋਝੀ ਪਾਵਣਿਆ ॥੪॥
मग तो मनुष्य रात्रंदिवस परमेश्वराच्या प्रेमात मग्न राहतो आणि त्याला खऱ्या दरबाराची जाणीव होते. ॥४॥
ਪਾਪ ਪੁੰਨ ਕੀ ਸਾਰ ਨ ਜਾਣੀ ॥
मूर्ख प्राणी पाप आणि पुण्य ओळखत नाही.
ਦੂਜੈ ਲਾਗੀ ਭਰਮਿ ਭੁਲਾਣੀ ॥
त्याचे मन भ्रमात रमून जाते त्यामुळे तो भ्रमात अडकून भटकत राहतो.
ਅਗਿਆਨੀ ਅੰਧਾ ਮਗੁ ਨ ਜਾਣੈ ਫਿਰਿ ਫਿਰਿ ਆਵਣ ਜਾਵਣਿਆ ॥੫॥
भ्रमात, अज्ञानी मनाला परमेश्वराच्या भेटीचा मार्ग कळत नाही ज्यामुळे तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि मरतो. ॥५॥
ਗੁਰ ਸੇਵਾ ਤੇ ਸਦਾ ਸੁਖੁ ਪਾਇਆ ॥
गुरूची सेवा केल्याने गुरूंचे अनुयायी सदैव सुख प्राप्त करतात.
ਹਉਮੈ ਮੇਰਾ ਠਾਕਿ ਰਹਾਇਆ ॥
अहंकाराचा नाश करून तो आपल्या भटक्या मनाला दुर्गुणांकडे जाण्यापासून थांबवतो.
ਗੁਰ ਸਾਖੀ ਮਿਟਿਆ ਅੰਧਿਆਰਾ ਬਜਰ ਕਪਾਟ ਖੁਲਾਵਣਿਆ ॥੬॥
गुरूंच्या उपदेशाचे पालन केल्याने व्यक्तीच्या मनातील मायेच्या आसक्तीचा अंधार दूर होतो. त्याच्या मायेच्या आसक्तीमुळे, ज्यावर त्याचे लक्ष होते ते घट्ट बंद असलेले दरवाजे उघडतात.॥६॥
ਹਉਮੈ ਮਾਰਿ ਮੰਨਿ ਵਸਾਇਆ ॥
तो आपला मनातील अहंकार दूर करून त्यात परमेश्वराला स्थान देतो.
ਗੁਰ ਚਰਣੀ ਸਦਾ ਚਿਤੁ ਲਾਇਆ ॥
मग तो सदैव गुरूंच्या चरणी आपले मन स्थिर ठेवतो.
ਗੁਰ ਕਿਰਪਾ ਤੇ ਮਨੁ ਤਨੁ ਨਿਰਮਲੁ ਨਿਰਮਲ ਨਾਮੁ ਧਿਆਵਣਿਆ ॥੭॥
गुरूंच्या कृपेने त्याचे मन आणि शरीर शुद्ध होते मग तो परमेश्वराचे शुद्ध मनाने नामस्मरण करत राहतो. ॥७॥
ਜੀਵਣੁ ਮਰਣਾ ਸਭੁ ਤੁਧੈ ਤਾਈ ॥
हे परमेश्वरा! सजीवांचा जन्म आणि मृत्यू सर्व काही तुझ्यावर अवलंबून आहे,
ਜਿਸੁ ਬਖਸੇ ਤਿਸੁ ਦੇ ਵਡਿਆਈ ॥
ज्याला तू क्षमा करतोस त्याला तू महानता प्रदान करतोस.
ਨਾਨਕ ਨਾਮੁ ਧਿਆਇ ਸਦਾ ਤੂੰ ਜੰਮਣੁ ਮਰਣੁ ਸਵਾਰਣਿਆ ॥੮॥੧॥੨॥
हे नानक! मनुष्याला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करणार्ऱ्या परमेश्वराचे तू सदैव नामस्मरण कर, त्याची स्तुती कर. ॥८॥१॥२॥
ਮਾਝ ਮਹਲਾ ੩ ॥
माझ महला ३ ॥
ਮੇਰਾ ਪ੍ਰਭੁ ਨਿਰਮਲੁ ਅਗਮ ਅਪਾਰਾ ॥
माझा परमेश्वर अगम्य आणि अपार आहे.
ਬਿਨੁ ਤਕੜੀ ਤੋਲੈ ਸੰਸਾਰਾ ॥
तो तराजूशिवाय जगाचे वजन करतो.
ਗੁਰਮੁਖਿ ਹੋਵੈ ਸੋਈ ਬੂਝੈ ਗੁਣ ਕਹਿ ਗੁਣੀ ਸਮਾਵਣਿਆ ॥੧॥
गुरूच्या सहवासात राहणाऱ्यालाच हे सत्य समजते. परमेश्वराच्या गुणांचे स्मरण करून तो त्याच्यात विलीन होतो. ॥१॥
ਹਉ ਵਾਰੀ ਜੀਉ ਵਾਰੀ ਹਰਿ ਕਾ ਨਾਮੁ ਮੰਨਿ ਵਸਾਵਣਿਆ ॥
जो मनुष्य परमेश्वराचे नाम हृदयात ठेवतो. माझे शरीर आणि मन मी त्यांना समर्पित करतो.
ਜੋ ਸਚਿ ਲਾਗੇ ਸੇ ਅਨਦਿਨੁ ਜਾਗੇ ਦਰਿ ਸਚੈ ਸੋਭਾ ਪਾਵਣਿਆ ॥੧॥ ਰਹਾਉ ॥
जो मनुष्य सत्यप्रभूंच्या नामस्मरणात तल्लीन असतो तो रात्रंदिवस जागृत राहतो आणि सत्याच्या दरबारात त्याला मोठे वैभव प्राप्त होते .॥१॥ रहाउ॥
ਆਪਿ ਸੁਣੈ ਤੈ ਆਪੇ ਵੇਖੈ ॥
हे परमेश्वरा! तू स्वतः सर्व प्राणिमात्रांच्या प्रार्थना ऐकतोस आणि त्यांना स्वतः त्यांची काळजी घेतो.
ਜਿਸ ਨੋ ਨਦਰਿ ਕਰੇ ਸੋਈ ਜਨੁ ਲੇਖੈ ॥
परमेश्वराचा ज्याच्यावर आशीर्वाद असतो तोच त्याच्या दरबारात स्वीकारला जातो.
ਆਪੇ ਲਾਇ ਲਏ ਸੋ ਲਾਗੈ ਗੁਰਮੁਖਿ ਸਚੁ ਕਮਾਵਣਿਆ ॥੨॥
ज्याला परमेश्वर स्वतःच्या ध्यानात गुंतवून ठेवतात, तोच माणूस त्याच्या ध्यानात गुंततो. केवळ गुरूंचे अनुयायी सत्य नामाचे आचरण करतात. ॥२॥
ਜਿਸੁ ਆਪਿ ਭੁਲਾਏ ਸੁ ਕਿਥੈ ਹਥੁ ਪਾਏ ॥
ज्याला परमेश्वर स्वतःच भुलवतो तो कोणाचा आश्रय घेऊ शकतो?
ਪੂਰਬਿ ਲਿਖਿਆ ਸੁ ਮੇਟਣਾ ਨ ਜਾਏ ॥
निर्मात्याचा हुकूम पुसता येत नाही, म्हणजेच मागील जन्माचे कर्माचे लिखाण पुसता येत नाही.
ਜਿਨ ਸਤਿਗੁਰੁ ਮਿਲਿਆ ਸੇ ਵਡਭਾਗੀ ਪੂਰੈ ਕਰਮਿ ਮਿਲਾਵਣਿਆ ॥੩॥
ते लोक खूप भाग्यवान आहेत ज्यांना सद्गुरू मिळाला आहे. सद्गुरू जी केवळ भाग्यानेच मिळतात. ॥३॥
ਪੇਈਅੜੈ ਧਨ ਅਨਦਿਨੁ ਸੁਤੀ ॥
जीवरूपी स्त्री या जगात रात्रंदिवस अज्ञानात मग्न राहते.
ਕੰਤਿ ਵਿਸਾਰੀ ਅਵਗਣਿ ਮੁਤੀ ॥
तिचा पती-परमेश्वर तिला विसरला आहे आणि तिच्या दुर्गुणांमुळे त्याने तिचा त्याग केला आहे.
ਅਨਦਿਨੁ ਸਦਾ ਫਿਰੈ ਬਿਲਲਾਦੀ ਬਿਨੁ ਪਿਰ ਨੀਦ ਨ ਪਾਵਣਿਆ ॥੪॥
ती रात्रंदिवस रडत राहते. पती-परमेश्वराशिवाय ती सुखाने झोपू शकत नाही. ॥४॥
ਪੇਈਅੜੈ ਸੁਖਦਾਤਾ ਜਾਤਾ ॥
गुरूची अनुयायी असलेल्या ज्या जीवरूपी स्त्रीने या जगात सुख देणारा आपला पती-परमेश्वर ओळखला आहे.
ਹਉਮੈ ਮਾਰਿ ਗੁਰ ਸਬਦਿ ਪਛਾਤਾ ॥
तिने आपल्या अहंकाराचा त्याग केला आहे आणि आपल्या गुरूंच्या शब्दातून तिने पती-परमेश्वराला ओळखले आहे.
ਸੇਜ ਸੁਹਾਵੀ ਸਦਾ ਪਿਰੁ ਰਾਵੇ ਸਚੁ ਸੀਗਾਰੁ ਬਣਾਵਣਿਆ ॥੫॥
ती नेहमी सुंदर पलंगावर झोपते आणि तिचा ती-परमेश्वर यांच्या सहवासाचा आनंद घेते. अशी जीवरूपी स्त्री परमेश्वराच्या सत्यनामाला आपली शोभा बनवते. ॥५॥