Guru Granth Sahib Translation Project

Guru Granth Sahib Marathi Page 58

Page 58

ਭਾਈ ਰੇ ਅਵਰੁ ਨਾਹੀ ਮੈ ਥਾਉ ॥ हे माझ्या बंधू ! गुरूला वगळता, मला जाण्यासाठी दुसरे कोणतेही स्थान नाही.
ਮੈ ਧਨੁ ਨਾਮੁ ਨਿਧਾਨੁ ਹੈ ਗੁਰਿ ਦੀਆ ਬਲਿ ਜਾਉ ॥੧॥ ਰਹਾਉ ॥ गुरूंनी माझ्यावर कृपा करून मला परमेश्वराच्या नामाचा खजिना दिला आहे; मी त्यांना समर्पित आहे. ॥१॥ रहाउ॥
ਗੁਰਮਤਿ ਪਤਿ ਸਾਬਾਸਿ ਤਿਸੁ ਤਿਸ ਕੈ ਸੰਗਿ ਮਿਲਾਉ ॥ गुरूंच्या शिकवणींमुळे सन्मान मिळतो. परमेश्वराच्या कृपेने माझी आणि गुरूची भेट घडवून येवो.
ਤਿਸੁ ਬਿਨੁ ਘੜੀ ਨ ਜੀਵਊ ਬਿਨੁ ਨਾਵੈ ਮਰਿ ਜਾਉ ॥ त्याच्याशिवाय, मी क्षणभर जगू शकत नाही. त्याच्या नावाशिवाय मी आध्यात्मिकरित्या मृत आहे.
ਮੈ ਅੰਧੁਲੇ ਨਾਮੁ ਨ ਵੀਸਰੈ ਟੇਕ ਟਿਕੀ ਘਰਿ ਜਾਉ ॥੨॥ मी आध्यात्मिकरित्या आंधळा आहे, मी परमेश्वराच्या नामाला कधीच विसरणार नाही. गुरूंच्या आशीर्वादाने त्याचा आश्रय घेऊन मी माझ्या मूळ निवासस्थानी (परलोक) पोहचेल. ॥२॥
ਗੁਰੂ ਜਿਨਾ ਕਾ ਅੰਧੁਲਾ ਚੇਲੇ ਨਾਹੀ ਠਾਉ ॥ ज्यांचे गुरू आध्यात्मिकरित्या (अज्ञानी) आंधळे आहेत त्यांना खरे घर सापडत नाही (परमेश्वराशी एकरूप होणे).
ਬਿਨੁ ਸਤਿਗੁਰ ਨਾਉ ਨ ਪਾਈਐ ਬਿਨੁ ਨਾਵੈ ਕਿਆ ਸੁਆਉ ॥ गुरूंशिवाय, परमेश्वराचे नाम प्राप्त होत नाही आणि नामशिवाय मानवी जीवनाचे कोणतेही उद्देश नाही.
ਆਇ ਗਇਆ ਪਛੁਤਾਵਣਾ ਜਿਉ ਸੁੰਞੈ ਘਰਿ ਕਾਉ ॥੩॥ (परमेश्वराच्या नावाशिवाय), आमचे आगमन आणि (या जगातून) निघणे आपल्याला निर्जन घराला भेट देणाऱ्या कावळ्यासारखे पश्चात्ताप करते. ॥३॥
ਬਿਨੁ ਨਾਵੈ ਦੁਖੁ ਦੇਹੁਰੀ ਜਿਉ ਕਲਰ ਕੀ ਭੀਤਿ ॥ परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय मानवी शरीराला अपार वेदना होतात आणि हे शरीर एखाद्या वाळूच्या भिंतीप्रमाणे कोसळते.
ਤਬ ਲਗੁ ਮਹਲੁ ਨ ਪਾਈਐ ਜਬ ਲਗੁ ਸਾਚੁ ਨ ਚੀਤਿ ॥ व्यक्तीच्या मनात परमेश्वराचे नाम आल्याशिवाय त्याला परमेश्वराचा सहवास प्राप्त होत नाही.
ਸਬਦਿ ਰਪੈ ਘਰੁ ਪਾਈਐ ਨਿਰਬਾਣੀ ਪਦੁ ਨੀਤਿ ॥੪॥ केवळ गुरूंच्या वचनाचे पालन केल्यामुळेच आपल्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होईल आणि इच्छा-मुक्त चिरंतन स्थितीपर्यंत पोहोचेल.॥४॥
ਹਉ ਗੁਰ ਪੂਛਉ ਆਪਣੇ ਗੁਰ ਪੁਛਿ ਕਾਰ ਕਮਾਉ ॥ (आणि असे राज्य मिळविण्यासाठी) मी माझ्या गुरूचा सल्ला घेईल आणि त्याला विचारल्यानंतर मी त्यानुसार कार्य करणार.
ਸਬਦਿ ਸਲਾਹੀ ਮਨਿ ਵਸੈ ਹਉਮੈ ਦੁਖੁ ਜਲਿ ਜਾਉ ॥ मी गुरूच्या वचनाद्वारे परमेश्वराची स्तुती करतो, जेणेकरून तो माझ्या हृदयात राहू शकेल आणि माझ्या अहंकारामुळे होणारे वेदना जाळले जाऊ शकते.
ਸਹਜੇ ਹੋਇ ਮਿਲਾਵੜਾ ਸਾਚੇ ਸਾਚਿ ਮਿਲਾਉ ॥੫॥ अंतर्ज्ञानाने परमेश्वराबरोबर आनंदी मिलन होऊ शकते आणि त्याच्या अनंतकाळच्या नावाने मी स्वतः चिरंतन देवाबरोबर एकरूप होऊ शकतो. ॥५॥
ਸਬਦਿ ਰਤੇ ਸੇ ਨਿਰਮਲੇ ਤਜਿ ਕਾਮ ਕ੍ਰੋਧੁ ਅਹੰਕਾਰੁ ॥ जे गुरूच्या शब्दाशी संलग्न आहेत, ते वासना, क्रोध, स्वार्थ आणि गर्विष्ठ पणाचा त्याग करतात आणि नीतिमान जीवन जगतात.
ਨਾਮੁ ਸਲਾਹਨਿ ਸਦ ਸਦਾ ਹਰਿ ਰਾਖਹਿ ਉਰ ਧਾਰਿ ॥ ते नेहमी परमेश्वराच्या नामाचा जयजयकार करतात आणि परमेश्वराचे स्मरण आपल्या हृदयात ठेवतात.
ਸੋ ਕਿਉ ਮਨਹੁ ਵਿਸਾਰੀਐ ਸਭ ਜੀਆ ਕਾ ਆਧਾਰੁ ॥੬॥ जो सर्व प्राणिमात्राच्या जीवनाचा आधार आहे, त्याला आपण आपल्या मनातून त्याला कसे विसरु शकतो? ॥६॥
ਸਬਦਿ ਮਰੈ ਸੋ ਮਰਿ ਰਹੈ ਫਿਰਿ ਮਰੈ ਨ ਦੂਜੀ ਵਾਰ ॥ जो गुरूच्या शब्दाचे पालन करून दुर्गुणांमुळे प्रभावित होत नाही, तो दुर्गुणांपासून दूर राहतो आणि पुन्हा कधीही आध्यात्मिक मृत्यूचा अनुभव घेत नाही.
ਸਬਦੈ ਹੀ ਤੇ ਪਾਈਐ ਹਰਿ ਨਾਮੇ ਲਗੈ ਪਿਆਰੁ ॥ आध्यात्मिक शिकवणीतूनच परमेश्वराच्या नामाबद्दल प्रेम निर्माण होते आणि परमेश्वराची प्राप्ती होते.
ਬਿਨੁ ਸਬਦੈ ਜਗੁ ਭੂਲਾ ਫਿਰੈ ਮਰਿ ਜਨਮੈ ਵਾਰੋ ਵਾਰ ॥੭॥ गुरूंच्या उपदेशाचे पालन न करता जग या नीतिमान जीवनापासून चुकीच्या मार्गाने जाते आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्रात अडकते.॥७॥
ਸਭ ਸਾਲਾਹੈ ਆਪ ਕਉ ਵਡਹੁ ਵਡੇਰੀ ਹੋਇ ॥ सर्व स्वतःची स्तुती करतात आणि स्वतःला महान म्हणतात.
ਗੁਰ ਬਿਨੁ ਆਪੁ ਨ ਚੀਨੀਐ ਕਹੇ ਸੁਣੇ ਕਿਆ ਹੋਇ ॥ गुरूशिवाय स्वतःला ओळखले जाऊ शकत नाही. फक्त बोलून किंवा ऐकून काय साधले जाते?
ਨਾਨਕ ਸਬਦਿ ਪਛਾਣੀਐ ਹਉਮੈ ਕਰੈ ਨ ਕੋਇ ॥੮॥੮॥ हे नानक! जो गुरूच्या वचनाद्वारे स्वतःची जाणीव करतो तो स्वतःवर अहंकार करत नाही. ॥ ८ ॥ ८ ॥
ਸਿਰੀਰਾਗੁ ਮਹਲਾ ੧ ॥ सिरीरागु महला १ ॥
ਬਿਨੁ ਪਿਰ ਧਨ ਸੀਗਾਰੀਐ ਜੋਬਨੁ ਬਾਦਿ ਖੁਆਰੁ ॥ जर एखाद्या जीवरूपी वधूने आपल्या पतीच्या अनुपस्थितीत स्वतःला सजवले असेल तर ती फक्त आपल्या तारुण्याला वाया घालवत आहे आणि ती दुःखाच्या अधीन आहे.
ਨਾ ਮਾਣੇ ਸੁਖਿ ਸੇਜੜੀ ਬਿਨੁ ਪਿਰ ਬਾਦਿ ਸੀਗਾਰੁ ॥ ती त्याच्या प्रेमाच्या सुखांचा आनंद घेऊ शकत नाही; तिच्या पतीशिवाय (परमेश्वर) तिचा संपूर्ण शृंगार व्यर्थ आहे.
ਦੂਖੁ ਘਣੋ ਦੋਹਾਗਣੀ ਨਾ ਘਰਿ ਸੇਜ ਭਤਾਰੁ ॥੧॥ दुर्दैवी वधूला खूप त्रास होतो, कारण तिच्या साथीदार तिच्यासोबत घरात (मन) राहत नाही.
ਮਨ ਰੇ ਰਾਮ ਜਪਹੁ ਸੁਖੁ ਹੋਇ ॥ हे माझ्या मना! सदैव परमेश्वराचे नामस्मरण कर आणि मनाला शांत ठेव.
ਬਿਨੁ ਗੁਰ ਪ੍ਰੇਮੁ ਨ ਪਾਈਐ ਸਬਦਿ ਮਿਲੈ ਰੰਗੁ ਹੋਇ ॥੧॥ ਰਹਾਉ ॥ गुरूशिवाय परमेश्वराचे प्रेम प्राप्त होत नाही. हे केवळ गुरूच्या शब्दाद्वारेच होते. परमेश्वराच्या नामाची संपत्ती मिळाली तरच त्याच्याविषयी मनात उत्कट प्रेम निर्माण होते. ॥१॥ रहाउ॥
ਗੁਰ ਸੇਵਾ ਸੁਖੁ ਪਾਈਐ ਹਰਿ ਵਰੁ ਸਹਜਿ ਸੀਗਾਰੁ ॥ गुरूंची सेवा केल्याने मनाला आनंद मिळतो आणि ज्ञानाचा शृंगार केल्याने पत्नीला पती म्हणून परमेश्वराची प्राप्ती होते.
ਸਚਿ ਮਾਣੇ ਪਿਰ ਸੇਜੜੀ ਗੂੜਾ ਹੇਤੁ ਪਿਆਰੁ ॥ परमेश्वराच्या उत्कट प्रेमामुळे पत्नीला तिच्या प्रियकराच्या सहवासात नक्कीच आनंद मिळतो.
ਗੁਰਮੁਖਿ ਜਾਣਿ ਸਿਞਾਣੀਐ ਗੁਰਿ ਮੇਲੀ ਗੁਣ ਚਾਰੁ ॥੨॥ गुरूंच्या कृपेने पत्नीची पती परमेश्वराशी ओळख होते. गुरूंना भेटून ती विनयशील व नम्र बनते, ॥२॥
ਸਚਿ ਮਿਲਹੁ ਵਰ ਕਾਮਣੀ ਪਿਰਿ ਮੋਹੀ ਰੰਗੁ ਲਾਇ ॥ हे प्रिय जीवरूपी वधू! सत्याद्वारे आपल्या पतीशी पुन्हा एकत्र हो आणि त्याच्याशी प्रेम करून तू तुझ्या प्रियकर पतीकडे (परमेश्वर) आकर्षित होणार. हे प्रिय जीवरूपी वधू! तुझ्या पतीने तुला त्याच्या प्रेमाने आकर्षित केले आहे म्हणून तू त्याच्या प्रेमात मग्न होऊन जा.
ਮਨੁ ਤਨੁ ਸਾਚਿ ਵਿਗਸਿਆ ਕੀਮਤਿ ਕਹਣੁ ਨ ਜਾਇ ॥ परमेश्वराशी एकरूप झाल्यामुळे आत्मा आणि शरीर दोन्ही सुखी होतात आणि त्या जीवनाच्या मूल्याचे वर्णन शब्दात करतात येत नाही.
ਹਰਿ ਵਰੁ ਘਰਿ ਸੋਹਾਗਣੀ ਨਿਰਮਲ ਸਾਚੈ ਨਾਇ ॥੩॥ ज्या जीवरूपी स्त्रीच्या हृदयात तिचा पती परमेश्वर विराजमान आहे, ती त्यांच्या सत्य नामाने पवित्र झाली आहे.॥३॥
ਮਨ ਮਹਿ ਮਨੂਆ ਜੇ ਮਰੈ ਤਾ ਪਿਰੁ ਰਾਵੈ ਨਾਰਿ ॥ जर तिने आपल्या मनातील अहंकाराचा नष्ट केला तर परात्पर परमेश्वर तिला अपार आनंद आणि आदर देतात.
ਇਕਤੁ ਤਾਗੈ ਰਲਿ ਮਿਲੈ ਗਲਿ ਮੋਤੀਅਨ ਕਾ ਹਾਰੁ ॥ त्या अवस्थेत, गळ्यातील माळेतील मोत्यांसारखे, पती-पत्नी एकमेकांशी जुळतात.
ਸੰਤ ਸਭਾ ਸੁਖੁ ਊਪਜੈ ਗੁਰਮੁਖਿ ਨਾਮ ਅਧਾਰੁ ॥੪॥ परंतु हे आध्यात्मिक आनंद केवळ सद्गुरूंच्या सहवासात अनुभवले जाते. गुरूंच्या आश्रय घेतल्याने त्यांना शांती प्राप्त होते. ॥४॥
ਖਿਨ ਮਹਿ ਉਪਜੈ ਖਿਨਿ ਖਪੈ ਖਿਨੁ ਆਵੈ ਖਿਨੁ ਜਾਇ ॥ एका क्षणात मनामध्ये एक विचार उद्भवतो आणि एका क्षणात तो निघून जातो.
ਸਬਦੁ ਪਛਾਣੈ ਰਵਿ ਰਹੈ ਨਾ ਤਿਸੁ ਕਾਲੁ ਸੰਤਾਇ ॥ परंतु जर एखाद्याला गुरूच्या शब्दाचा खरा सार जाणवला आणि तो परमेश्वराशी एकरूप झाला तर मृत्यूची भीती देखील त्याला त्रास देत नाही.


© 2017 SGGS ONLINE
error: Content is protected !!
Scroll to Top