Page 289
ਜਨਮ ਜਨਮ ਕੇ ਕਿਲਬਿਖ ਜਾਹਿ ॥
तुझी अनेक जन्मांची पापे दूर होतील.
ਆਪਿ ਜਪਹੁ ਅਵਰਾ ਨਾਮੁ ਜਪਾਵਹੁ ॥
स्वतः परमेश्वराचे नामस्मरण करा आणि इतरांनाही नामस्मरण करण्यास प्रेरित करा.
ਸੁਨਤ ਕਹਤ ਰਹਤ ਗਤਿ ਪਾਵਹੁ ॥
परमेश्वराचे नाव ऐकल्याने, बोलल्याने आणि आचरणात आणल्याने उच्च आध्यात्मिक स्थिती प्राप्त केली जाते.
ਸਾਰ ਭੂਤ ਸਤਿ ਹਰਿ ਕੋ ਨਾਉ ॥
हरीचेच (परमेश्वराचे) नाम सत्य आहे.
ਸਹਜਿ ਸੁਭਾਇ ਨਾਨਕ ਗੁਨ ਗਾਉ ॥੬॥
हे नानक! शांत मानाने परमेश्वराची स्तुती करा. ॥ ६॥
ਗੁਨ ਗਾਵਤ ਤੇਰੀ ਉਤਰਸਿ ਮੈਲੁ ॥
(हे जीव!) परमेश्वराचे गुणगान केल्याने आपल्या दुर्गुणाची घाण स्वच्छ होते
ਬਿਨਸਿ ਜਾਇ ਹਉਮੈ ਬਿਖੁ ਫੈਲੁ ॥
आणि अहंकाराच्या रूपात पसरलेले विषही नाहीसे होते.
ਹੋਹਿ ਅਚਿੰਤੁ ਬਸੈ ਸੁਖ ਨਾਲਿ ॥
तो चिंतेपासून मुक्त होईल आणि आनंदाने जगेल.
ਸਾਸਿ ਗ੍ਰਾਸਿ ਹਰਿ ਨਾਮੁ ਸਮਾਲਿ ॥
प्रत्येक श्वासात परमेश्वराचे नामस्मरण करा.
ਛਾਡਿ ਸਿਆਨਪ ਸਗਲੀ ਮਨਾ ॥
हे माझ्या मना! आपल्या सर्व हुशारीचा त्याग करा.
ਸਾਧਸੰਗਿ ਪਾਵਹਿ ਸਚੁ ਧਨਾ ॥
संताची संगत केल्याने खरी संपत्ती मिळेल.
ਹਰਿ ਪੂੰਜੀ ਸੰਚਿ ਕਰਹੁ ਬਿਉਹਾਰੁ ॥
परमेश्वराच्या नावाची संपत्ती जमा करा आणि त्याप्रमाणेच कृती करा.
ਈਹਾ ਸੁਖੁ ਦਰਗਹ ਜੈਕਾਰੁ ॥
अशाप्रकारे तुम्हाला या जीवनात आनंद मिळेल आणि परमेश्वराच्या दरबारात तुमचा सन्मान होईल.
ਸਰਬ ਨਿਰੰਤਰਿ ਏਕੋ ਦੇਖੁ ॥
त्याला सर्वत्र एकच परमेश्वर दिसतो,
ਕਹੁ ਨਾਨਕ ਜਾ ਕੈ ਮਸਤਕਿ ਲੇਖੁ ॥੭॥
हे नानक! ज्याच्या नशिबात हे सर्व पूर्वनिर्धारित असते त्याला हा आशीर्वाद प्राप्त होतो. ॥ ७ ॥|
ਏਕੋ ਜਪਿ ਏਕੋ ਸਾਲਾਹਿ ॥
एकाच परमेश्वराचे नामस्मरण करा आणि त्याचीच स्तुती करा.
ਏਕੁ ਸਿਮਰਿ ਏਕੋ ਮਨ ਆਹਿ ॥
एका परमेश्वराचा विचार करा आणि त्यालाच तुमच्या हृदयात वास करू द्या.
ਏਕਸ ਕੇ ਗੁਨ ਗਾਉ ਅਨੰਤ ॥
त्या अनंत परमेश्वराचे सदैव गुणगान करा.
ਮਨਿ ਤਨਿ ਜਾਪਿ ਏਕ ਭਗਵੰਤ ॥
मनाने आणि शरीराने एका परमेश्वराचे नामस्मरण करा.
ਏਕੋ ਏਕੁ ਏਕੁ ਹਰਿ ਆਪਿ ॥
तो परमेश्वर स्वत: एक आणि एकमेव आहे.
ਪੂਰਨ ਪੂਰਿ ਰਹਿਓ ਪ੍ਰਭੁ ਬਿਆਪਿ ॥
परमेश्वर सर्व प्राणिमात्रांमध्ये सर्वव्यापी असून सर्वत्र वास करत आहे.
ਅਨਿਕ ਬਿਸਥਾਰ ਏਕ ਤੇ ਭਏ ॥
सृष्टीचा विस्तार त्या एकाच ईश्वराने केला आहे.
ਏਕੁ ਅਰਾਧਿ ਪਰਾਛਤ ਗਏ ॥
प्रेमळ भक्तीने परमेश्वराचे नामस्मरण केल्याने सर्व पापे नष्ट होतात.
ਮਨ ਤਨ ਅੰਤਰਿ ਏਕੁ ਪ੍ਰਭੁ ਰਾਤਾ ॥
माझे मन आणि शरीर एका परमेश्वरात लीन झाले आहे.
ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦਿ ਨਾਨਕ ਇਕੁ ਜਾਤਾ ॥੮॥੧੯॥
हे नानक! गुरूंच्या कृपेने त्याने एकाच परमेश्वराला अनुभवले आहे.
ਸਲੋਕੁ ॥
श्लोक॥
ਫਿਰਤ ਫਿਰਤ ਪ੍ਰਭ ਆਇਆ ਪਰਿਆ ਤਉ ਸਰਨਾਇ ॥
हे पूज्य परमेश्वर! अनेक स्थानी भटकंती करून मी तुझ्याकडे आश्रयाला आलो आहे.
ਨਾਨਕ ਕੀ ਪ੍ਰਭ ਬੇਨਤੀ ਅਪਨੀ ਭਗਤੀ ਲਾਇ ॥੧॥
हे परमेश्वरा ! नानकांनी एकच विनंती केली की, मला तुझ्या भक्तीत गुंतवून टाका.
ਅਸਟਪਦੀ ॥
अष्टपदी ॥
ਜਾਚਕ ਜਨੁ ਜਾਚੈ ਪ੍ਰਭ ਦਾਨੁ ॥
हे परमेश्वरा ! हा भक्त तुमच्याकडून नामच्या देणगीसाठी विनवणी करत आहे,
ਕਰਿ ਕਿਰਪਾ ਦੇਵਹੁ ਹਰਿ ਨਾਮੁ ॥
हे हरी ! कृपया मला तुमचा आशीर्वाद द्या.
ਸਾਧ ਜਨਾ ਕੀ ਮਾਗਉ ਧੂਰਿ ॥
मी तर संताच्या चरणी आश्रय मागत आहे.
ਪਾਰਬ੍ਰਹਮ ਮੇਰੀ ਸਰਧਾ ਪੂਰਿ ॥
हे परब्रह्म! कृपया माझी इच्छा पूर्ण करा.
ਸਦਾ ਸਦਾ ਪ੍ਰਭ ਕੇ ਗੁਨ ਗਾਵਉ ॥
मी नेहमी परमेश्वराची स्तुती करत राहणार.
ਸਾਸਿ ਸਾਸਿ ਪ੍ਰਭ ਤੁਮਹਿ ਧਿਆਵਉ ॥
हे परमेश्वरा ! मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझे नामस्मरण करत राहील.
ਚਰਨ ਕਮਲ ਸਿਉ ਲਾਗੈ ਪ੍ਰੀਤਿ ॥
मी परमेश्वराच्या चरणी माझे सर्वस्व अर्पण केले आहे
ਭਗਤਿ ਕਰਉ ਪ੍ਰਭ ਕੀ ਨਿਤ ਨੀਤਿ ॥
आणि मी नेहमी परमेश्वराची उपासना करतो.
ਏਕ ਓਟ ਏਕੋ ਆਧਾਰੁ ॥
हे परमेश्वरा ! तू माझा एकमेव आश्रय आणि आधार आहेस.
ਨਾਨਕੁ ਮਾਗੈ ਨਾਮੁ ਪ੍ਰਭ ਸਾਰੁ ॥੧॥
हे प्रभू ! नानक तुझ्या उत्तम नावासाठी प्रार्थना करतो. ॥ १॥
ਪ੍ਰਭ ਕੀ ਦ੍ਰਿਸਟਿ ਮਹਾ ਸੁਖੁ ਹੋਇ ॥
परमेश्वराच्या कृपा-दृष्टीने सर्वोच्च आनंद प्राप्त होतो.
ਹਰਿ ਰਸੁ ਪਾਵੈ ਬਿਰਲਾ ਕੋਇ ॥
परंतु फक्त दुर्मिळ व्यक्तीलाच परमेश्वराच्या नामाचे अमृत प्राप्त होते.
ਜਿਨ ਚਾਖਿਆ ਸੇ ਜਨ ਤ੍ਰਿਪਤਾਨੇ ॥
जे परमेश्वराच्या नामाचे अमृत चाखतात ते पूर्णपणे तृप्त होतात.
ਪੂਰਨ ਪੁਰਖ ਨਹੀ ਡੋਲਾਨੇ ॥
ते परिपूर्ण पुरुष बनतात आणि कधीही (मायेत) डगमगत नाहीत.
ਸੁਭਰ ਭਰੇ ਪ੍ਰੇਮ ਰਸ ਰੰਗਿ ॥
तो परमेश्वराच्या प्रेमाच्या गोडव्याने आणि आनंदाने पूर्णपणे भरलेला असतो.
ਉਪਜੈ ਚਾਉ ਸਾਧ ਕੈ ਸੰਗਿ ॥
संतांच्या सहवासात राहिल्याने त्यांच्या मनात आध्यात्मिक इच्छा निर्माण होते.
ਪਰੇ ਸਰਨਿ ਆਨ ਸਭ ਤਿਆਗਿ ॥
इतर सर्व गोष्टींचा त्याग करून तो परमेश्वराचा आश्रय घेतो.
ਅੰਤਰਿ ਪ੍ਰਗਾਸ ਅਨਦਿਨੁ ਲਿਵ ਲਾਗਿ ॥
त्याचे हृदय तेजस्वी होते आणि तो रात्रंदिवस आपले लक्ष परमेश्वराकडे केंद्रित करतो.
ਬਡਭਾਗੀ ਜਪਿਆ ਪ੍ਰਭੁ ਸੋਇ ॥
सर्वात भाग्यवान असे व्यक्ती आहेत, ज्यांनी परमेश्वराचे नामस्मरण केले आहे.
ਨਾਨਕ ਨਾਮਿ ਰਤੇ ਸੁਖੁ ਹੋਇ ॥੨॥
हे नानक! जे पुरुष परमेश्वराच्या नामात तल्लीन राहतात त्यांना सुख प्राप्त होते. ॥ २ ॥
ਸੇਵਕ ਕੀ ਮਨਸਾ ਪੂਰੀ ਭਈ ॥
भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत.
ਸਤਿਗੁਰ ਤੇ ਨਿਰਮਲ ਮਤਿ ਲਈ ॥
जेव्हापासून मला सद्गुरुंची निर्मळ शिकवण प्राप्त झाली आहे.
ਜਨ ਕਉ ਪ੍ਰਭੁ ਹੋਇਓ ਦਇਆਲੁ ॥
परमेश्वराने त्याच्या सेवकावर कृपा केली आहे
ਸੇਵਕੁ ਕੀਨੋ ਸਦਾ ਨਿਹਾਲੁ ॥
आणि आपल्या भक्ताला सदैव सुखी ठेवले आहे.
ਬੰਧਨ ਕਾਟਿ ਮੁਕਤਿ ਜਨੁ ਭਇਆ ॥
सेवकाचे (मायेचे) बंधने तुटून त्याला मोक्ष प्राप्त झाला आहे.
ਜਨਮ ਮਰਨ ਦੂਖੁ ਭ੍ਰਮੁ ਗਇਆ ॥
त्याची जन्म-मृत्यू, दु:ख, द्विधा मनस्थिती दूर झाली आहे.
ਇਛ ਪੁਨੀ ਸਰਧਾ ਸਭ ਪੂਰੀ ॥
तात्पर्य: त्यांची इच्छा पूर्ण झाली असून त्यांची श्रद्धाही पूर्ण झाली आहे.
ਰਵਿ ਰਹਿਆ ਸਦ ਸੰਗਿ ਹਜੂਰੀ ॥
त्याला सर्वत्र आणि स्वतःमध्ये कायम परमेश्वराची उपस्थिती जाणवते.
ਜਿਸ ਕਾ ਸਾ ਤਿਨਿ ਲੀਆ ਮਿਲਾਇ ॥
भक्त ज्याच्याशी संबंधित आहे त्याला परमेश्वराने स्वत:सोबत एकरूप केले आहे.
ਨਾਨਕ ਭਗਤੀ ਨਾਮਿ ਸਮਾਇ ॥੩॥
हे नानक! परमेश्वराच्या भक्तीने सेवक नामात लीन होतो. ॥ ३॥
ਸੋ ਕਿਉ ਬਿਸਰੈ ਜਿ ਘਾਲ ਨ ਭਾਨੈ ॥
त्या परमेश्वराला का विसरावे, जो मनुष्यांच्या सेवा आणि भक्तीकडे दुर्लक्ष करत नाही.
ਸੋ ਕਿਉ ਬਿਸਰੈ ਜਿ ਕੀਆ ਜਾਨੈ ॥
त्या परमेश्वराला का विसरावे, जो त्याने केलेले कार्य जाणतो?