Page 282
ਆਪੇ ਆਪਿ ਸਗਲ ਮਹਿ ਆਪਿ ॥
परमेश्वर स्वत: सर्वकाही करतो. तो स्वतः सर्वांमध्ये (जीवांमध्ये) सामावलेला आहे.
ਅਨਿਕ ਜੁਗਤਿ ਰਚਿ ਥਾਪਿ ਉਥਾਪਿ ॥
विविध मार्गांनी तो विश्व निर्माण करतो आणि त्याचा नाशही करतो.
ਅਬਿਨਾਸੀ ਨਾਹੀ ਕਿਛੁ ਖੰਡ ॥
परमेश्वर अविनाशी आहे आणि त्यामुळे त्याचे काहीही नष्ट होत नाही.
ਧਾਰਣ ਧਾਰਿ ਰਹਿਓ ਬ੍ਰਹਮੰਡ ॥
तो स्वत: विश्वाचे नियोजन आणि समर्थन करीत आहे.
ਅਲਖ ਅਭੇਵ ਪੁਰਖ ਪਰਤਾਪ ॥
परमेश्वराचा महिमा अनाकलनीय आणि अफाट आहे.
ਆਪਿ ਜਪਾਏ ਤ ਨਾਨਕ ਜਾਪ ॥੬॥
हे नानक,जर तो आपले नामस्मरण स्वतः मनुष्याकडून करून घेतो तेव्हाच तो नामस्मरण करतो. ॥६॥
ਜਿਨ ਪ੍ਰਭੁ ਜਾਤਾ ਸੁ ਸੋਭਾਵੰਤ ॥
ज्यांना परमेश्वराची जाणीव झाली आहे ते गौरवशाली आहेत.
ਸਗਲ ਸੰਸਾਰੁ ਉਧਰੈ ਤਿਨ ਮੰਤ ॥
त्यांची शिकवण संपूर्ण जगाला दुर्गुणांपासून वाचवते.
ਪ੍ਰਭ ਕੇ ਸੇਵਕ ਸਗਲ ਉਧਾਰਨ ॥
परमेश्वराचे सेवक सर्वांचे कल्याण करतात.
ਪ੍ਰਭ ਕੇ ਸੇਵਕ ਦੂਖ ਬਿਸਾਰਨ ॥
परमेश्वराचे सेवक प्रत्येकाचे दु:ख दूर करण्यास सक्षम आहेत.
ਆਪੇ ਮੇਲਿ ਲਏ ਕਿਰਪਾਲ ॥
दयाळू परमेश्वर त्यांना स्वतःशी जोडतो.
ਗੁਰ ਕਾ ਸਬਦੁ ਜਪਿ ਭਏ ਨਿਹਾਲ ॥
गुरूच्या वचनाचे प्रेमाने मनन केल्याने त्यांना आनंद होतो.
ਉਨ ਕੀ ਸੇਵਾ ਸੋਈ ਲਾਗੈ ॥
केवळ भाग्यवानच व्यक्तीच परमेश्वराच्या सेवेत गुंतलेला असतो,
ਜਿਸ ਨੋ ਕ੍ਰਿਪਾ ਕਰਹਿ ਬਡਭਾਗੈ ॥
त्याला परमेश्वर आपला आशीर्वाद देतो.
ਨਾਮੁ ਜਪਤ ਪਾਵਹਿ ਬਿਸ੍ਰਾਮੁ ॥
जे मनुष्य परमेश्वराचे नामस्मरण करतात त्यांना सुख प्राप्त होते.
ਨਾਨਕ ਤਿਨ ਪੁਰਖ ਕਉ ਊਤਮ ਕਰਿ ਮਾਨੁ ॥੭॥
हे नानक! त्या व्यक्तींना सर्वात थोर समजा. ॥७॥
ਜੋ ਕਿਛੁ ਕਰੈ ਸੁ ਪ੍ਰਭ ਕੈ ਰੰਗਿ ॥
भक्त तो जे काही करतो ते परमेश्वराच्या आज्ञेनुसारच करतो.
ਸਦਾ ਸਦਾ ਬਸੈ ਹਰਿ ਸੰਗਿ ॥
आणि तो परमेश्वरासोबत सदैव वास करतो.
ਸਹਜ ਸੁਭਾਇ ਹੋਵੈ ਸੋ ਹੋਇ ॥
जे काही अंतर्ज्ञानाने घडते, तो परमेश्वराची इच्छा म्हणून स्वीकारतो.
ਕਰਣੈਹਾਰੁ ਪਛਾਣੈ ਸੋਇ ॥
आणि तो फक्त त्या सृष्टी निर्माता ईश्वराला ओळखतो.
ਪ੍ਰਭ ਕਾ ਕੀਆ ਜਨ ਮੀਠ ਲਗਾਨਾ ॥
परमेश्वराने जे केले आहे ते त्याच्या सेवकांना गोड आहे म्हणजे तो त्याला आनंदाने स्वीकारतो.
ਜੈਸਾ ਸਾ ਤੈਸਾ ਦ੍ਰਿਸਟਾਨਾ ॥
कारण परमेश्वर जसा आहे तसाच तो त्याला दिसतो.
ਜਿਸ ਤੇ ਉਪਜੇ ਤਿਸੁ ਮਾਹਿ ਸਮਾਏ ॥
ज्यांच्यापासून तो जन्माला येतात, तो त्याच्यामध्ये विसर्जित होतो.
ਓਇ ਸੁਖ ਨਿਧਾਨ ਉਨਹੂ ਬਨਿ ਆਏ ॥
परमेश्वर शांतीचा खजिना आहे आणि ही प्रतिष्ठा केवळ त्यालाच शोभते.
ਆਪਸ ਕਉ ਆਪਿ ਦੀਨੋ ਮਾਨੁ ॥
भक्तांचा सन्मान करून परमेश्वर स्वत:चा सन्मान करतो.
ਨਾਨਕ ਪ੍ਰਭ ਜਨੁ ਏਕੋ ਜਾਨੁ ॥੮॥੧੪॥
हे नानक! परमेश्वर आणि त्याचा सेवक (भक्त) एक समान आहेत हे समजून घ्या. ॥८॥१४॥
ਸਲੋਕੁ ॥
श्लोक।
ਸਰਬ ਕਲਾ ਭਰਪੂਰ ਪ੍ਰਭ ਬਿਰਥਾ ਜਾਨਨਹਾਰ ॥
परमेश्वर सर्वशक्तिमान आहे आणि आपल्या सर्वांचे दुःख जाणणारा आहे.
ਜਾ ਕੈ ਸਿਮਰਨਿ ਉਧਰੀਐ ਨਾਨਕ ਤਿਸੁ ਬਲਿਹਾਰ ॥੧॥
हे नानक! ज्याच्या नामस्मरणाने मोक्ष प्राप्त होतो त्याच्यासाठी मी स्वत:ला समर्पित करतो. ॥१॥
ਅਸਟਪਦੀ ॥
अष्टपदी॥
ਟੂਟੀ ਗਾਢਨਹਾਰ ਗੋੁਪਾਲ ॥
परमेश्वर स्वत: त्याच्यापासून दुरावलेल्या हृदयाला पुन्हा एकत्र करण्यास सक्षम आहे.
ਸਰਬ ਜੀਆ ਆਪੇ ਪ੍ਰਤਿਪਾਲ ॥
परमेश्वर स्वत: सर्व प्राण्यांची काळजी घेतो.
ਸਗਲ ਕੀ ਚਿੰਤਾ ਜਿਸੁ ਮਨ ਮਾਹਿ
ज्याच्या मनात प्रत्येकासाठी काळजी असते,
ਤਿਸ ਤੇ ਬਿਰਥਾ ਕੋਈ ਨਾਹਿ ॥
कोणीही त्याच्याकडून रिकाम्या हाताने परतत नाही.
ਰੇ ਮਨ ਮੇਰੇ ਸਦਾ ਹਰਿ ਜਾਪਿ ॥
हे माझ्या मना ! नेहमी परमेश्वराचे नामस्मरण कर.
ਅਬਿਨਾਸੀ ਪ੍ਰਭੁ ਆਪੇ ਆਪਿ ॥
अविनाशी देव सर्व काही आहे.
ਆਪਨ ਕੀਆ ਕਛੂ ਨ ਹੋਇ ॥
एखाद्याच्या स्वत:च्या कृतीतून काहीही साध्य होत नाही,
ਜੇ ਸਉ ਪ੍ਰਾਨੀ ਲੋਚੈ ਕੋਇ ॥
जरी नश्वर शेकडो वेळा अशी इच्छा बाळगू शकते.त्याची शेकडो वेळा इच्छा झाली तरीही.
ਤਿਸੁ ਬਿਨੁ ਨਾਹੀ ਤੇਰੈ ਕਿਛੁ ਕਾਮ ॥
त्या शिवाय काहीही त्याच्या कामाचे किंवा उपयोगाचे नाही.
ਗਤਿ ਨਾਨਕ ਜਪਿ ਏਕ ਹਰਿ ਨਾਮ ॥੧॥
हे नानक! परमेश्वराच्या नामस्मरणाने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. ॥१॥
ਰੂਪਵੰਤੁ ਹੋਇ ਨਾਹੀ ਮੋਹੈ ॥
जर एखादा प्राणी खूप सुंदर असेल तर तो आपोआप इतरांना मोहित (आकर्षित) करत नाही.
ਪ੍ਰਭ ਕੀ ਜੋਤਿ ਸਗਲ ਘਟ ਸੋਹੈ ॥
कारण परमेश्वराचा प्रकाश सर्व शरीरांत सुंदर दिसतो.
ਧਨਵੰਤਾ ਹੋਇ ਕਿਆ ਕੋ ਗਰਬੈ ॥
एखाद्या व्यक्तीने श्रीमंत झाल्यावर स्वतःवर गर्व का करावा?
ਜਾ ਸਭੁ ਕਿਛੁ ਤਿਸ ਕਾ ਦੀਆ ਦਰਬੈ ॥
सर्व संपत्ती त्या परमेश्वरानेच दिलेली आहे.
ਅਤਿ ਸੂਰਾ ਜੇ ਕੋਊ ਕਹਾਵੈ ॥
जर एखादा माणूस स्वतःला महान योद्धा समजतो तर
ਪ੍ਰਭ ਕੀ ਕਲਾ ਬਿਨਾ ਕਹ ਧਾਵੈ ॥
त्याला हे समजले पाहिजे की परमेश्वराच्या सामर्थ्याच्या देणगीशिवाय तो काय करू शकतो?
ਜੇ ਕੋ ਹੋਇ ਬਹੈ ਦਾਤਾਰੁ ॥
जो मनुष्य दान देतो आणि नंतर दाता बनण्याबद्दल बढाई मारतो,
ਤਿਸੁ ਦੇਨਹਾਰੁ ਜਾਨੈ ਗਾਵਾਰੁ ॥
अशा मूर्खांनी हे ओळखले पाहिजे की देव सर्वांचा एकमात्र दाता आहे.म्हणून दाता परमेश्वर त्या मनुष्याला मूर्ख समजतो.
ਜਿਸੁ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦਿ ਤੂਟੈ ਹਉ ਰੋਗੁ ॥
गुरूंच्या कृपेने, ज्याच्या अहंकाराचा आजार बरा होतो,
ਨਾਨਕ ਸੋ ਜਨੁ ਸਦਾ ਅਰੋਗੁ ॥੨॥
हे नानक! तो मनुष्य नेहमी आध्यात्मिकदृष्ट्या निरोगी असतो. ॥ २ ॥
ਜਿਉ ਮੰਦਰ ਕਉ ਥਾਮੈ ਥੰਮਨੁ ॥
ज्याप्रमाणे एक खांब मंदिराचा आधारस्तंभ असतो,
ਤਿਉ ਗੁਰ ਕਾ ਸਬਦੁ ਮਨਹਿ ਅਸਥੰਮਨੁ ॥
त्याचप्रमाणे गुरूंचा शब्द मनाला आधार देतो.
ਜਿਉ ਪਾਖਾਣੁ ਨਾਵ ਚੜਿ ਤਰੈ ॥
ज्याप्रमाणे बोटीत ठेवलेला दगड नदी ओलांडतो,
ਪ੍ਰਾਣੀ ਗੁਰ ਚਰਣ ਲਗਤੁ ਨਿਸਤਰੈ ॥
त्याचप्रमाणे गुरुंच्या शिकवणुकीचे बारकाईने पालन करून ऐहिक दुर्गुणांच्या महासागर व्यक्ती पर करतो.
ਜਿਉ ਅੰਧਕਾਰ ਦੀਪਕ ਪਰਗਾਸੁ ॥
ज्याप्रमाणे एक दिवा अंधारात प्रकाश देतो,
ਗੁਰ ਦਰਸਨੁ ਦੇਖਿ ਮਨਿ ਹੋਇ ਬਿਗਾਸੁ ॥
त्याचप्रमाणे गुरूंचे दर्शन झाल्यावर मनाला आनंद होतो.
ਜਿਉ ਮਹਾ ਉਦਿਆਨ ਮਹਿ ਮਾਰਗੁ ਪਾਵੈ ॥
ज्याप्रमाणे मनुष्याला मोठ्या जंगलात रस्ता सापडतो,
ਤਿਉ ਸਾਧੂ ਸੰਗਿ ਮਿਲਿ ਜੋਤਿ ਪ੍ਰਗਟਾਵੈ ॥
त्याचप्रमाणे संतांच्या सहवासात राहिल्याने मनुष्याच्या हृदयात परमेश्वराचा प्रकाश प्रकट होतो.
ਤਿਨ ਸੰਤਨ ਕੀ ਬਾਛਉ ਧੂਰਿ ॥
मी त्या संतांच्या चरणांची धूळ मागतो.
ਨਾਨਕ ਕੀ ਹਰਿ ਲੋਚਾ ਪੂਰਿ ॥੩॥
हे परमेश्वरा ! नानाकची ही इच्छा पूर्ण करा. ॥ ३॥
ਮਨ ਮੂਰਖ ਕਾਹੇ ਬਿਲਲਾਈਐ ॥
हे मूर्ख मना ! तू का आक्रोश करतो आहे?